मुदखेड तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का, ५ किमीपर्यंत जाणवले हादरे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 11:56 AM2022-12-10T11:56:48+5:302022-12-10T11:57:20+5:30
कोणतीही नुकसान झाले नाही किंवा भिंतीला तडे गेल्याची नोंद नाही
- संतोष गाडे
मुदखेड : तालुक्यातील शेम्बोली, पांढरवाडी, नागेली या गावांमध्ये १० डिसेंबर रोजी पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. तीन रिस्टर स्केल एवढी या भूकंपाची तीव्रता असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.
मुदखेड तालुक्यातील शेंबोली, पांढरवाडी, नागेली, तीरकसवाडी या गावांमध्ये शनिवारी पहाटेच्या सुमारास हा सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला. कोणतीही नुकसान झाले नाही किंवा भिंतीला तडे गेल्याची नोंद नसल्याची माहिती नायब तहसीलदार संजय नागमवाड यांनी दिली.
परिसरातील गावांमध्ये भूकंप झाला आहे. कुठेही नुकसान नाही, अशी माहिती नागेली येथील रहिवासी तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे यांनी दिली. शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर ३ रिस्टर स्केल अशी या भूकंपाची नोंद घेण्यात आली असून, त्याची तीव्रता ५ किमी पर्यंत होती.