नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के, हदगावमध्ये केंद्रबिंदू; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 09:24 AM2024-10-22T09:24:16+5:302024-10-22T09:25:57+5:30

अधिकृतरित्या दिलेल्या वृत्तानुसार या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर 3.8 अशी नोंदविण्यात आलेली आहे.

Mild earthquake in Nanded and around Nanded city, information from District Emergency Operations Center | नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के, हदगावमध्ये केंद्रबिंदू; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के, हदगावमध्ये केंद्रबिंदू; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नांदेड/हिंगोली :नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांना मंगळवारी (22 ऑक्टोबर 2024)  सकाळी 06:52 मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यासंदर्भात जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रानेही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केलवर 3.8 एवढी नोंदवण्यात आली आहे.

महत्वाचे म्हणजे, भूकंपाचा केंद्रबिंदू नांदेड शहरापासून 29 किमी दूर उत्तरपूर्व दिशेला हदगाव तालुक्यातील सावरगाव येते होता. या धक्क्यामुळे कुठलीही जीवित वा वित्त हानी नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राला प्राप्त झाली असल्याचे नांदेडमधील जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालयाने म्हटले आहे.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हदगाव या तालुक्यांनाही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती आहे. हिंगोली जिल्ह्यात गेल्या सहा वर्षापासून भुकंपाचे धक्के जाणवत आहेत. यापूर्वीही 4.5 रिश्टर स्केलचा धक्का जाणवला होता. गत सह ते सात वर्षापासुन सतत वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ तालुक्यास सतत भूकंपाचे धक्के बसत आहेत.  त्यामुळे नागरीकांत भीती व्यक्त केली जात आहे.

भूकंप नांदेड जिल्ह्यात; हदरला हिंगोली जिल्हा...
मंगळवारी नांदेड जिल्ह्यात भूकंप झाला आणि हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत तालुक्यातील दांडेगाव, पांगरा शिंदे, वारंगा, कुरूंदा, कवठा, पिंप्राळा ,डोणवाडा व इतर अनेक भागांमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला आहे.

नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी..
तालुका प्रशासन नागरिकांची काळजी घेत आहे. अशावेळी नागरिकांनीही घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वसमतचे तहसीलदार शारदा दळवी यांनी केले आहे.

Web Title: Mild earthquake in Nanded and around Nanded city, information from District Emergency Operations Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.