कृषी कायद्याच्या मंगल कलशाला दुग्धाभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:34 AM2020-12-15T04:34:18+5:302020-12-15T04:34:18+5:30
यावेळी भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण साले म्हणाले की, मोदी सरकारने केलेले तीन कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. मुदाम शेतकऱ्यांमध्ये ...
यावेळी भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण साले म्हणाले की, मोदी सरकारने केलेले तीन कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. मुदाम शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करून दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे, या आंदोलनात मूळ शेतकरी नसून विरोधातले छोटे छोटे पक्ष एकत्र येऊन करत असलेले हे आंदोलन आहे.
रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे म्हणाले की, केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे शेतकऱ्याला स्वातंत्र्याची नवी पहाट निर्माण करणारे कायदे आहेत. शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी यांनी ९० च्या दशकात जी मागणी केली होती, त्या मागणीला अनुसरून केलेले हे शेतकऱ्याच्या हिताचे कायदे आहेत. आमचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात कृषी कायद्याच्या समर्थनात मंगल कलशास दुग्धाभिषेक घालून या कायद्याचे स्वागत होत आहे.
यावेळी भाजपा युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस अरुण पोफळे, सचिन कदम, विठ्ठल इंगोले, नितीन आबादार, बालाजी पांचाळ, नीलेश ढवळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.