स्वारातीम विद्यापीठात ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ नांदेड’ अभिनव उपक्रम राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:20 AM2021-02-09T04:20:17+5:302021-02-09T04:20:17+5:30
या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी-पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि शैक्षणिक संस्था आदी विविध घटकांच्या अडी-अडचणींवर चर्चा करून त्या सोडविण्यात येणार आहेत. उच्च ...
या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी-पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि शैक्षणिक संस्था आदी विविध घटकांच्या अडी-अडचणींवर चर्चा करून त्या सोडविण्यात येणार आहेत. उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत हा उपक्रम राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये राबविण्यात येत आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने सर्व संबंधित घटकांच्या सोयीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळाच्या मुख्यपृष्ठावर ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ नांदेड’ ही विशेष वेब लिंक सुरू करण्यात आली आहे. येथे विद्यार्थी-पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, शैक्षणिक संस्था आदींसह नागरिकांना इंग्रजी अथवा युनिकोड मराठीतून आपले प्रश्न मांडता येणार आहेत. तसेच निवेदनाची सॉफ्ट कॉपी जोडण्याची व्यवस्थाही येथे देण्यात आलेली आहे. या पत्रकार परिषदेस विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एल.एम. वाघमारे, जनसंपर्क अधिकारी डॉ.अशोक कदम यांची उपस्थिती होती.