गुरुद्वारा बोर्डाच्या शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:23 AM2021-02-17T04:23:25+5:302021-02-17T04:23:25+5:30
येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा मिळावा अशी मागणी शीख समाज बांधवांच्या वतीने करण्यात येत होती. यासाठी ...
येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा मिळावा अशी मागणी शीख समाज बांधवांच्या वतीने करण्यात येत होती. यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण शासनाकडे पाठपुरावा करीत होते. अखेर शासनाने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुद्वारा बोर्डाच्या शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.
येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने खालसा माध्यमिक विद्यालय, खालसा प्राथमिक विद्यालय, सचखंड पब्लिक स्कूल व हुजूर साहिब औद्योगिक प्रशिक्षण संस्था आदी शैक्षणिक संस्था चालविल्या जातात. या शैक्षणिक संस्थांना आता अल्पसंख्याक दर्जा मिळणार आहे. या प्रश्नाबाबत पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांचे लक्ष वेधले होते.
विशेष म्हणजे गुरुद्वारा बोर्डाच्या शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा मिळाल्याने शैक्षणिक संस्थांत कर्मचारी भरती करताना बिंदुनियमावलीनुसार आरक्षणाची अट असणार नाही. यासमवेत अल्पसंख्याक संस्थांबाबतचाही लाभ मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयाबद्दल पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पाठपुराव्याचे शीख समाजबांधवांनी कौतुक केले.