मीरा टोम्पे यांना वनपाल म्हणून पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:17 AM2021-03-19T04:17:27+5:302021-03-19T04:17:27+5:30
मंदिराचे भूमिपूजन नायगाव : बरबडा येथील एकनाथ महाराज मंदिराचे भूमिपूजन चंद्रशेखर महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी चंद्रशेखर ...
मंदिराचे भूमिपूजन
नायगाव : बरबडा येथील एकनाथ महाराज मंदिराचे भूमिपूजन चंद्रशेखर महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी चंद्रशेखर महाराजांचे कीर्तनही झाले. मंदिर बांधकामासाठी ट्रस्ट स्थापन करण्यात आला. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
अध्यक्षपदी गुज्जरवाड
बिलोली : तालुक्यातील गागलेगाव जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती प्रमुखपदी सुरेखा व्यंकट गुज्जरवाड यांची, तर उपाध्यक्षपदी नसीबा कौसर शेख यांची एकमताने निवड झाली. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
वारंवार वीजपुरवठा खंडित
कंधार : शिराढोण ३३ केव्ही अंतर्गत येणाऱ्या १८ गावांतील २५२ डीपीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. वीजपुरवठा नसल्यामुळे भुईमूग, ज्वारी, बटाटा आदी पिकांचे पाण्याअभावी नुकसान होत असून, पिण्याचे पाणी व जनावरांच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
होळकर यांची जयंती साजरी
मुदखेड : शहरातील राजे मल्हारराव होळकर चौक येथे होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव देवदे, माजी नगरसेवक कैलास गोडसे, नगरसेवक, संजय आऊलवार, देवा धबडगे, गोविंद बने, गोविंद महादळे, प्रकाश सूर्यवंशी, मारोती गुंटे, मारोती कमजळे आदी उपस्थित होते.
लसीकरणाला सुरुवात
किनवट : तालुक्यातील शिवणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीला सुरुवात झाली. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.
मशागतीच्या कामांना प्रारंभ
हिमायतनगर : परिसरात उन्हाळी शेती मशागतीच्या कामांना सुरुवात झाली. गहू, हरभरा, ज्वारीच्या नांगरणी, फणकटीच्या कामांना वेग आला. यासाठी आधुनिक यंत्राचा वापर केला जात आहे.
पाणपोईची व्यवस्था
लोहा : येथील तहसील कार्यालयाच्या मुख्य इमारतीमध्ये पाणपोईची सोय करण्यात आली आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांची सोय व्हावी यासाठी ही पाणपोई सुरू करण्यात आली. नायब तहसीलदार राम बोरगावकर, देवराई यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन झाले. यावेळी मंडळ अधिकारी के.बी. भोसीकर, तलाठी सुरेश तांबरे, डी.एल. कठारे, संदीप कल्याणकर, संदीप फड, राजू इंगळे, अरविंद कावळे आदी उपस्थित होते.
बालाजी पाटील यांची निवड
मुखेड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा सचिवपदी बालाजी पाटील माळेगावे यांची निवड झाली. यावेळी संघटनेचे हणुमंत पाटील राजेगोरे, शिवशंकर पाटील कलंबरकर आदी उपस्थित होते. या निवडीचे अनेकांनी स्वागत केले आहे.
होळकर जयंती साजरी
अर्धापूर : शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकात राजे मल्हारराव होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नागोराव बारसे, नीळकंठ मदने, डॉ.विशाल लंगडे, नगरसेवक तुकाराम साखरे, छत्रपती कानोडे, नवनाथ बारसे, सचिन येवले, अशोक कानोडे, बापुराव पाटील, प्रा. संजय अटक आदी उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांची बैठक
हदगाव : येथील पालिकेतील कर्मचाऱ्यांची बैठक मुख्याधिकारी जाधव यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन जाधव यांनी केले. यावेळी त्यांनी कोरोना नियमात ढील सहन केली जाणार नाही, असे सांगितले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
कामाचा शुभारंभ
हिमायतनगर : रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन आमदार माधवराव जवळगावकर यांच्या हस्ते झाले. मागील दोन वर्षापूर्वी हे काम सुरू करण्यात आले होते. शहरातील होंडा शोरूम ते रेल्वे गेटपर्यंतचे काम रखडले होते. ही बाब लक्षात घेऊन जवळगावकर यांनी संबंधितांचे लक्ष वेधले. यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसीलदार डी.एन. गायकवाड, पोलीस निरीक्षक भगवान कांबळे, रफीक सेठ, गणेश शिंदे, सुभाष राठोड, सुभाष शिंदे, परमेश्वर गोपतवाड आदी उपस्थित होते.