स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात जिल्ह्यात मिशन आपुलकी उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:24 AM2021-08-17T04:24:44+5:302021-08-17T04:24:44+5:30
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार ...
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, शिक्षण सभापती संजय बेळगे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बाळासाहेब रावणगावकर आदींची उपस्थिती होती.
या उपक्रमाबद्दल जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे “मिशन आपुलकी” या स्तुत्य उपक्रमाबद्दल अभिनंदन केले. लोकसहभागाचे प्रतीक असणाऱ्या या उपक्रमात मीसुध्दा एक गावचा नागरिक म्हणून मालेगाव व धनेगाव या दोन्ही गावांसाठी माझे योगदान द्यायला आनंदाने तयार असून, जिल्हाधिकारी यांनी तशी कामे सुचवावीत असे पालकमंत्री चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले. या बैठकीत मिशन आपुलकी या पुस्तिकेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. सूत्रसंचालन व्यंकटेश चौधरी यांनी केले. आभार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी मानले.
अनुकंपाधारकांना नियुक्तीचे आदेश प्रदान
महसूल विभागातील ज्या कर्मचाऱ्यांचे निधन झाले आहे, अशा अनुकंपाधारकांना पालकमंत्री अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या उपस्थितीत देवयानी मधुकर पाठक, कोमल बाबाराव अल्लमवार, ओमकार संतोष डुडले, कल्पना सुभाष भिसे, कल्पना मधुकर भुरके, अजय नरसिंग दुधकावडे, मोहम्मद कैफ गुलाम हाफिज यांना नियुक्तीचे आदेश प्रदान करण्यात आले.