बाजारातून मोबाईल लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:12 AM2020-12-07T04:12:15+5:302020-12-07T04:12:15+5:30
घर बांधकामासाठी दोन लाखांची मागणी नांदेड- हदगांव तालुक्यातील मौजे पळसा येथे पैशाच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. घर बांधकाम ...
घर बांधकामासाठी दोन लाखांची मागणी
नांदेड- हदगांव तालुक्यातील मौजे पळसा येथे पैशाच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. घर बांधकाम करण्यासाठी विवाहितेला माहेराहून दोन लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीसाठी मारहाण करुन घराबाहेर हाकलण्यात आले. या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरुन मनाठा पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळीच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
व्यवसायाच्या पैशासाठी विवाहितेचा छळ
नांदेड- व्यवसाय टाकण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार पुसद तालुक्यातील मौजे हिवळणी येथे घडला. महिलेच्या सासरच्या मंडळींनी पतीस व्यवसाय करावयाचा म्हणून पीडितेला माहेराहून पाच लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच पैसे न आणल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणात हदगांव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दत्तबर्डी तांडा येथे दारु पकडली
नांदेड- हदगांव तालुक्यातील दत्तबर्डी तांडा येथे पोलिसांनी दारु पकडली. या ठिकाणी अवैधपणे विक्रीसाठी साडेपाच हजार रुपयांची देशी दारु ठेवण्यात आली होती. या प्रकरणात सपोनि नामदेव मद्दे यांच्या तक्रारीवरुन हदगांव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.