मोबाईलची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:31 AM2021-02-06T04:31:29+5:302021-02-06T04:31:29+5:30
महेश शर्मा रूजू मुदखेड - येथील पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक म्हणून महेश शर्मा रूजू झाले आहेत. यापूर्वीचे सुनील ...
महेश शर्मा रूजू
मुदखेड - येथील पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक म्हणून महेश शर्मा रूजू झाले आहेत. यापूर्वीचे सुनील निकाळजे यांनी नियंत्रण कक्षात बदली झाली होती. दरम्यान शर्मा यांचे अनेकांनी स्वागत केले.
गजभारे सेवानिवृत्त
नांदेड - जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी रामदास गजभारे सेवानिवृत्त झाल्याने त्यांना सपत्नीक निरोप देण्यात आला. कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेसी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, निवडणूक विभागाचे प्रशांत शेळके, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रमुनी सावंत, महिला संघटनेच्या संगीता खोले उपस्थित होत्या.
सोनकांबळे सेवानिवृत्त
कंधार - येथील मूळचे तथा विमानतळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार यादवराव सोनकांबळे सेवानिवृत्त झाल्याने पोलीस अधीक्षक कार्यालयातील कार्यक्रमात त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या हस्ते सोनकांबळे पती-पत्नीचा सत्कार करण्यात आला. सोनकांबळे यांनी भोकर, वजिराबाद, नांदेड ग्रामीण, देगलूर येथे सेवा बजावली होती.
बेंबरेकर यांचा सत्कार
देगलूर - तालुक्यातील बेंबरा ग्रामपंचायत निवडणुकीत प्रकाश पाटील बेंबरेकर यांच्या पॅनलचे ९ पैकी ८ उमेदवार विजयी झाल्याबद्दल त्यांचा आडत व्यापारी शिक्षण संस्था व देगलूर महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव शशिकांत चिद्रावार होते. यावेळी उपाध्यक्ष नारायणराव मैलागीरे, कोषाध्यक्ष विलास तोटावार, सदस्य राजकुमार महाजन, देवेंद्र मोटेवार, जनार्दन चिद्रावार, रवींद्र द्याडे, अनिल चिद्रावार, उपप्राचार्य प्रकाश कद्रेकर, एन.एच.गोविंदवार उपस्थित होते. सूत्रसंचालन ए.आर. डांगे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. कत्तूरवार यांनी मानले.
सभामंडपाचे भूमीपूजन
हदगाव - महातळा येथील हनुमान मंदिराच्या सभामंडपाचे भूमीपूजन माजी आ. नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी प्रभाकर सूर्यवंशी, नथू पाटील, उत्तमराव पाटील उपस्थित होते. यावेळी भगवानराव शिंदे, विनायकराव कदम, सुधाकर महाजन, काशीराव कदम, राजेंद्र जाधव, पंजाब शिंदे आदीही होते.
श्रामनेर प्रशिक्षण शिबीर
नांदेड - तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामनेर प्रशिक्षण केंद्रात दहा दिवसांचे विशेष प्रशिक्षण शिबीर १७ ते२७ फेब्रुवारी दरम्यान होणार असल्याची माहिती केंद्राचे संचालक भदंत पय्याबोधी थेरो यांनी दिली. यानिमित्त भदंत मेतानंद, भदंत संघरत्न, भंते चंद्रमनी, भंते धम्मकीर्ती, भंते सुदर्शन, भंते श्रद्धानंद, भंते शीलभद्र, भंते सदानंद मार्गदर्शन करणार आहेत.
विविध कामांचे भूमीपूजन
मांडवी - आ.भीमराव केराम यांच्या हस्ते शुक्रवारी विविध कामांचे लोकार्पण व भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सरपंच हिराबाई सिडाम, जि.प. सदस्य मधुकर राठोड, पं.स. सदस्य इंदल राठोड, रेणुका कांबळे, संध्या राठोड, प्रफुल्ल राठोड, तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे आदी उपस्थित होते.
एटीएम फोडले
गडगा - येथील नरसी-मुखेड रस्त्यावरील एटीएम फोडून चोरट्यांनी २ लाखांच्या वर रक्कम लंपास केली. पोलिसांनी नांदेडहून श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. या घटनेमुळे व्यापारी धास्तावले आहेत.
अखंड सप्ताहाची सांगता
कुंडलवाडी - बिलोली तालुक्यातील दौलापूर येथे अखंड हरीनाम सप्ताहाची विविध धार्मिक कार्यक्रमाने सांगता झाली. २ फेब्रुवारी रोजी काल्याचे कीर्तन झाले. कीर्तनानंतर महाप्रसाद झाला. यावेळी परिसरातील भाविकांची उपस्थिती होती.