हदगावमध्ये मोबाइल चोराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:16 AM2021-02-08T04:16:16+5:302021-02-08T04:16:16+5:30
कार लंपास गडगा : गडगा ते कहाळा जाणाऱ्या रोडवरील स्वस्त धान्य दुकानासमोरून चोरट्यांनी एम.एच.- ४३ ए.- ५३२० या क्रमांकाची ...
कार लंपास
गडगा : गडगा ते कहाळा जाणाऱ्या रोडवरील स्वस्त धान्य दुकानासमोरून चोरट्यांनी एम.एच.- ४३ ए.- ५३२० या क्रमांकाची कार चोरून नेली. ही घटना ४ फेब्रुवारी रोजी घडली. नितेश कदम (रा. सोमठाणा, ता. हदगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
देशी दारू जप्त
हदगाव : तालुक्यातील त्रिकूट ते पाथरड रोडवर पोलिसांनी अवैध दारू जप्त केली. यावेळी १२ हजार ४८० रुपयांची देशी दारू व ५५ हजारांची स्कूटी जप्त करण्यात आली. स्थागुशाचे शिवलिंग वडजे यांनी ही कारवाई केली.
सारंग यांना निरोप
नांदेड : शिवाजीनगर पोस्ट ऑफिसमधील पोस्ट मास्तर शेषराव सारंग सेवानिवृत्त झाले. त्यांना उपडाकपाल संजीव भिसे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात निरोप देण्यात आला. यावेळी शंकर देशमुख, सतीश आडगावकर आदी उपस्थित होते.
लाभार्थ्यांना अनुदान वाटप
मांडवी : वन्य प्राण्यांकडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आ. भीमराव केराम यांच्या हस्ते अनुदान वाटप करण्यात आले. यावेळी सचिन नाईक, अनिल तिरमनवार, वनपरिक्षेत्राधिकारी योगेश येरेकर, शेख, रमेश जायभाये, सुनील श्रीमनवार, इंद्रपाल कांबळे आदी उपस्थित होते.
रस्ता दुरुस्तीची मागणी
कुंडलवाडी : बिलोली ते धर्माबादकडे जाणाऱ्या रस्त्यावर असंख्य खड्डे पडल्याने रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे. बिलोली ते कुंडलवाडीच्या चुंगी नाक्यापर्यंत रस्त्याचे काम झाले. त्यापुढील रस्ता उखडून गिट्टी टाकून बुझविण्यात आला. गेल्या एक महिन्यापासून हा रस्ता तसाच पडून आहे. दुरुस्तीची मागणी प्रयागबाई श्रीरामे यांनी केली.
अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
अर्धापूर : तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच निवडीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी १८ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या. ८, १०, १२ तारखेला सरपंच पदाची निवड होईल. दरम्यान या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील वातावरण चांगलेच तापत आहे.
मिरेवाड यांना पुरस्कार
नायगाव : अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था पुणेच्या वतीने साहित्यिक वीरभद्र मिरेवाड यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला. १४ फेब्रुवारी रोजी या पुरस्काराचे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संगीता बर्वे यांनी दिली.
माळाकोळीत क्रिकेट स्पर्धा
माळाकोळी येथील श्री बारा ज्योर्तिलिंग देवस्थान यात्रेनिमित्त स्व. निरंजन पाटील स्मृती चषक, खुल्या टेनिस बॉल क्रिकटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ११ फेब्रुवारीपासून स्पर्धा सुरू होतील. यात प्रथम बक्षिसात ३१ हजार ५५५, द्वितीय २१ हजार १११, तृतीय - ११ हजार १११ रुपये दिले जाणार आहेत.