मोबाईल टॉवरचे साहित्य लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:20 AM2021-02-09T04:20:08+5:302021-02-09T04:20:08+5:30

नांदेड-जिल्ह्यात भोकर आणि नांदेड शहरात शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी चोरीला गेल्या. बोरगाव रस्त्यावर नारायण लक्ष्मण उंचेवाड यांनी ...

Mobile tower material lampas | मोबाईल टॉवरचे साहित्य लंपास

मोबाईल टॉवरचे साहित्य लंपास

Next

नांदेड-जिल्ह्यात भोकर आणि नांदेड शहरात शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी चोरीला गेल्या.

बोरगाव रस्त्यावर नारायण लक्ष्मण उंचेवाड यांनी एम.एच.२६, बीएम ३१८० या क्रमांकाची दुचाकी उभी केली होती. ५० हजार रुपये किमतीची ही दुचाकी लंपास करण्यात आली. तर शिवाजीनगर हद्दीत विजयनगर येथून माधव नंदकुमार बास्टेवाड यांची एम.एच.२६, वाय ५२३६ या क्रमांकाची दुचाकी चोरट्याने लांबविली. याप्रकरणात संबधित पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शेतीच्या वादातून महिलेला मारहाण

नांदेड- देगलूर तालुक्यातील तमलूर येथे शेती नावाने करुन देण्याच्या कारणावरुन एका महिलेला मारहाण करण्यात आली. ही घटना ४ फेब्रुवारी रोजी घडली.

तिस्टाबाई माचनवाड ही महिला ४ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास अंगणात बसलेली असताना आरोपी त्या ठिकाणी आला. यावेळी आरोपीने तुझ्या नावावर असलेली शेती आमच्या नावे का करुन देत नाही असे म्हणून तिस्टाबाई यांना मारहाण केली. या मारहाणीत त्यांचे दोन दात पडले. या प्रकरणात तिस्टाबाई माचनवाड यांनी देगलूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ.सकनूरे हे करीत आहेत.

खंजर घेवून फिरणारा अटकेत

नांदेड- कंधार शहरात बेकायदेशीररित्या खंजर घेवून फिरणा-या एकाला पोलिसांनी अटक केली आहे.साकुराबाई वाघमारे या महिलेच्या घराजवळ हा आरोपी हातात खंजर घेवून थांबलेला होता. पोलिसांनी त्याच्या जवळील खंजर जप्त केले असून या प्रकरणात कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दारुची चोरटी वाहतूक करताना पकडले

नांदेड- देगलूर शहरातील देगाव नाका भागात दारुची चोरटी वाहतुक करताना पोलिसांनी एकाला पकडले. त्याच्याकडून अडीच हजार रुपयांची देशी दारु जप्त करण्यात आली. या प्रकरणात पोउपनि बसवेश्वर जकीकोरे यांच्या तक्रारीवरुन देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

Web Title: Mobile tower material lampas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.