दोन वर्षांपासून पैसे थकले; शेतकऱ्यांचा सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न

By शिवराज बिचेवार | Published: August 14, 2023 03:29 PM2023-08-14T15:29:26+5:302023-08-14T15:29:54+5:30

. पैसे देण्याच्या मागणीसाठी अनेकवेळा पाठपुरावा केला पण पैसे देण्यात आले नाही.

Money exhausted for two years; Mass self-immolation attempt by farmers in Nanded | दोन वर्षांपासून पैसे थकले; शेतकऱ्यांचा सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न

दोन वर्षांपासून पैसे थकले; शेतकऱ्यांचा सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न

googlenewsNext

नांदेड: शेतमाल विकत घेणाऱ्या कंपनीकडे थकलेले पैसे दिले जात नसल्याने शेतकऱ्यांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी पैसे तत्काळ देण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. 

नांदेड मधील कुष्णुर एमआयडीसीतील इंडिया मेगा एग्रॉ कंपनीकडे शेतकऱ्यांनी हळद, सोयाबीन, मका, हरभरा अश्या पिकांची विक्री केली होती. जवळपास एक हजार शेतकऱ्यांनी 2020 ते 2021 मध्ये आपला शेतमाल विक्री केला होता. पण कंपनीने दोन वर्ष उलटूनही अद्याप शेतक-यांना पैसे दिले नाही. पैसे देण्याच्या मागणीसाठी अनेकवेळा पाठपुरावा केला पण पैसे देण्यात आले नाही. त्यामुळे आज दुपारी शेतकऱ्यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. पण पोलीसांनी तात्काळ पकडल्याने पुढील अनर्थ टळला. आंदोलक शेतकऱ्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले.

Web Title: Money exhausted for two years; Mass self-immolation attempt by farmers in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.