पत्नीचे नाक कापून पसार झालेला बनला साधू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 04:14 AM2017-12-26T04:14:30+5:302017-12-26T04:14:33+5:30

भोकर (जि. नांदेड) : पत्नीचे नाक कापून फरार झालेल्या व वेषांतर करून साधू म्हणून राहणाºया आरोपीला तब्बल २३ वर्षांनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले.

The monk has become extensively cut off from his nose | पत्नीचे नाक कापून पसार झालेला बनला साधू

पत्नीचे नाक कापून पसार झालेला बनला साधू

Next

भोकर (जि. नांदेड) : पत्नीचे नाक कापून फरार झालेल्या व वेषांतर करून साधू म्हणून राहणाºया आरोपीला तब्बल २३ वर्षांनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. नामदेव येडे असे त्याचे नाव असून तो माहूर येथील गडावर छगन भारती या नावाने अनेक वर्षांपासून साधू म्हणून वावरत होता.
मुदखेड तालुक्यातील नामदेव किशन येडे याने २३ नोव्हेंबर १९९४ रोजी किरकोळ वादातून भोकर शहरातील रेल्वे स्थानकाजवळ चाकूने पत्नीचे नाक कापले होते. याप्रकरणी त्याची पत्नी शोभाबाई यांच्या फिर्यादीवरून भोकर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला होता. तेव्हापासून नामदेव पसार होता. तो गडावर साधूच्या वेशात राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.

Web Title: The monk has become extensively cut off from his nose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.