दीड लाखाहून अधिक विद्यार्थी देत आहेत क्लस्टर पद्धतीने परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:17 AM2021-03-19T04:17:25+5:302021-03-19T04:17:25+5:30
ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देण्याबाबतचा पर्याय संमती पत्राद्वारे भरून दिला आहे. त्याच विद्यार्थ्याला घरी बसून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा ...
ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देण्याबाबतचा पर्याय संमती पत्राद्वारे भरून दिला आहे. त्याच विद्यार्थ्याला घरी बसून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देता येणार आहे. यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास पर्याय बदलून दिला जाणार नाही. ऑनलाइन परीक्षेदरम्यान काही तांत्रिक कारणाने खंड पडल्यास तेवढाच कालावधी संबंधित विद्यार्थ्यांना वाढून दिला जाणार आहे. ऑनलाइन ऑफलाइन पद्धतीने परीक्षा वेळापत्रकानुसार एकाच वेळेस सुरू होतील आणि त्याचा कालावधी एक तासाचा असणार आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकाही बहुपर्यायी पद्धतीची आहे. ज्यामध्ये ४० प्रश्न ४० गुणांचे आहेत. पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ही परीक्षा ४० गुणांची आहे; पण ५० प्रश्न असणार आहेत त्यापैकी ४० प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवायचे आहेत. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. हिवाळी-२०२० मधील सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना गुण पडताळणी (रिकाऊंटिंग) करण्याची संधी सशुल्क देण्यात येणार आहे, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी सरोदे यांनी सांगितले.