मराठवाड्यात सर्वात जास्त पीकविमा मुखेडला!; १३४ कोटी रुपये प्राप्त झाल्याची आमदार राठोड यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 07:22 PM2018-06-19T19:22:43+5:302018-06-19T19:22:43+5:30

प्रधानमंत्री राष्ट्रीय पीकविमा योजनेतंर्गत मुखेड तालुक्याला यंदा १३३ कोटी ९० लाख ७५ हजार रुपये पीकविमा मंजूर झाल्याची माहिती आ.डॉ. तुषार राठोड यांनी दिली.

Most Pavitima Mukhedla in Marathwada! Rs 134 crore has been received by MLA Rathore | मराठवाड्यात सर्वात जास्त पीकविमा मुखेडला!; १३४ कोटी रुपये प्राप्त झाल्याची आमदार राठोड यांची माहिती

मराठवाड्यात सर्वात जास्त पीकविमा मुखेडला!; १३४ कोटी रुपये प्राप्त झाल्याची आमदार राठोड यांची माहिती

Next
ठळक मुद्देतालुक्यातील ५४ हजार ६१३ हेक्टर क्षेत्रातील १ लाख ३३ हजार ३९९ शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता.

मुखेड (नांदेड ) : प्रधानमंत्री राष्ट्रीय पीकविमा योजनेतंर्गत मुखेड तालुक्याला यंदा १३३ कोटी ९० लाख ७५ हजार रुपये पीकविमा मंजूर झाल्याची माहिती आ.डॉ. तुषार राठोड यांनी सोमवारी दिली. मराठवाड्यात सर्वात जास्त विमा मुखेड तालुक्याला प्राप्त झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

तालुक्यातील ५४ हजार ६१३ हेक्टर क्षेत्रातील १ लाख ३३ हजार ३९९ शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता. यामध्ये  सोयाबीन पिकावर ४५ हजार ६४३ शेतकऱ्यांनी ३० हजार ३०७.७२ हेक्टर शेतीवर विमा उतरविला होता तर यामध्ये ४५ हजार ६४३ शेतकऱ्यांना १०२ कोटी १५ लक्ष ३१ हजार ७४४ रुपये प्राप्त झाले. उडीद पिकावर ३२ हजार २६३ शेतकऱ्यांनी  ९ हजार ५७२  हेक्टर शेतीवर विमा उतरविला होता तर यामध्ये ३२ हजार २६३ शेतकऱ्यांना १३ कोटी ८८ लाख ४४ हजार ९०.९ रुपये, कापूस लागवड ४ हजार ७२८ शेतकऱ्यांनी १ हजार ५२१.७७ हेक्टर शेतीवर विमा उतरविला होता तर यामध्ये ४ हजार  शेतकऱ्यांना २ कोटी ३४ लक्ष ५४ हजार ४४२ रुपये प्राप्त झाले.

मूग पिकावर ३३ हजार ३८५ शेतकऱ्यांनी ९ हजार ४१८.३३ हेक्टर शेतीवर विमा उतरविला होता. त्यात ३३ हजार ३८५ शेतकऱ्यांना १२ कोटी ९० लाख ८१हजार ३७३.२ रुपये प्राप्त झाले.  तुर पिकावर ८ हजार ४६४ शेतकऱ्यांना १ हजार ७०३.३४ हेक्टर शेतीवर विमा उतरविला होता तर यामध्ये ४ हजार ३९ शेतकऱ्यांना ६ लाख ३१ हजार ३२ हजार ३२० रुपये प्राप्त झाले.  ज्वारी पिकावर ६ हजार ९३१ शेतकऱ्यांनी १ हजार ७३७.०५ हेक्टर शेतीवर विमा उतरविला होता तर यामध्ये ६ हजार ९३१ शेतकऱ्यांना २ कोटी ५५ लाख ३२ हजार ११२ रुपये प्राप्त झाले. 

यावेळी  माजी आमदार अविनाश घाटे, तहसीलदार अतुल जटाळे, तालुका कृषी अधिकारी विकास नारनाळीकर, श्रीराम पाटील राजूरकर, व्यंकटराव पाटील गोजेगावकर, अ‍ॅड. बळवंतराव पाटील बेटमोगरेकर, माधव साठे, सभापती अशोक पाटील रावीकर, कृउबा सभापती खुशालराव पाटील उमरदरीकर, तालुकाध्यक्ष नामदेव पाटील जाहूरकर, बालाजी पाटील आंबुलगेकर, हणमंतराव मस्कले, व्यंकटराव पाटील चांडोळकर, डॉ. वीरभद्र हिमगिरे, डॉ. माधव उच्चेकर, अशोक गजलवाड, किशोरसिंह चौहाण आदी उपस्थित होते.

Web Title: Most Pavitima Mukhedla in Marathwada! Rs 134 crore has been received by MLA Rathore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.