जीप अपघातात मायलेकाचा मृत्यू
By admin | Published: March 22, 2017 09:57 PM2017-03-22T21:57:23+5:302017-03-22T21:57:23+5:30
आजारी बाळाला रुग्णालयातून उपचार करुन घरी परतत असताना जीप अपघातात आई आणि बाळाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक
ऑनलाइन लोकमत
हदगाव (जि. नांदेड), दि. 22 - आजारी बाळाला रुग्णालयातून उपचार करुन घरी परतत असताना जीप अपघातात आई आणि बाळाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी सायंकाळी तरोडा (ता. हदगाव) येथे घडली.
तरोडा येथील पांडुरंग अंबाजी डुमणे ( वय ४०) हे उपजीविकेसाठी प्रवासी जीप चालवतात. दिवसभर जीपचा व्यवसाय केला. त्यांना दीड महिन्याचे बाळ. सायंकाळी घरी परतल्यानंतर बाळ आजारी असल्याचे समजताच त्यांनी पत्नी वंदनासह जीपने मनाठा गाठले. मनाठा येथे बाळावर डॉक्टरांना दाखवून परत गावाकडे जात असताना तरोडा गावाजवळ जीप उलटून वंदनाच्या अंगावर पडली.जीपखाली सापडून बाळ आणि त्याची आई जागीच दगावले. वंदनाबाई यांनी दोन्ही हातात बाळाला धरले होते. ‘त्या’ अलगद जीपच्या बाहेर पडल्या. नेमकी जीप उलटून दोघेही जीपखाली दबल्या. जीपमध्ये अन्य काही प्रवासी होते, त्यांना खरचटलेही नाही, चालक पांडुरंग यांना मार लागला. पांडुरंग यांना दोन मुली, मुलगा अशी अपत्य आहे. आई, बाळाचा मृत्यू झाल्याचे कळून दोघांची प्रेत घरी येताच मुलांनी केलेला आक्रोश उपस्थितांना हेलावून सोडणारा ठरला. (वार्ताहर)