नांदेड जिल्ह्यात वंचित आघाडीचे ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:31 AM2019-06-18T00:31:15+5:302019-06-18T00:32:43+5:30
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईव्हीएम हटाव देश बचाव आंदोलनातंर्गत घंटानाद करून ईव्हीएम जाळले़
नांदेड : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईव्हीएम हटाव देश बचाव आंदोलनातंर्गत घंटानाद करून ईव्हीएम जाळले़
विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका या बॅलेट पेपरवर व्हाव्यात व खऱ्या लोकप्रतिनिधींना संधी मिळावी, यासाठी ईव्हीएम हटाओ, देश बचाओ आंदोलनाचे आयोजन केले होते़. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाहीचा देश आहे. भारतीय लोकशाही सर्वश्रेष्ठ संविधानामुळे समृद्ध आहे़ जगातील अनेक लोकशाही देशांनी ईव्हीएम मशीन नाकारली आहे़ मात्र वंचित बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व नाकारणाºया प्रस्थापित सरकारने ईव्हीएम मशीनचा स्वीकार केला आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे़ राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोटाळा झाला असून प्रत्यक्ष झालेले मतदान आणि करण्यात आलेली मतमोजणी यात तफावत आढळून आली़ त्यासंदर्भातील पुरावे राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत़ मात्र त्यावर निवडणूक आयोग्य गंभीर नसल्याने राज्यभर घंटानाद आंदोलन करण्यात आले़ ईव्हीएमला विरोध करून मतपत्रिकेद्वारेच निवडणुका घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली़ आंदोलनामध्ये भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी, ए.आय.एम.आय.एम., रिपब्लिकन सेना, लोकस्वराज आंदोलन, सुराज्य सेना, युवा पँथर, ओबीसी संघटना, इंडियन डेमोक्रेटिक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भन्ते पयांबोधी, फेरोज लाला, डॉ़ संघरत्न कुरे, मोहन राठोड, बालाजी खर्डे पाटील, शिवाजी गेडेवाड, श्याम कांबळे, दीपक कसबे, बाळासाहेब सोनकांबळे, संतोष आगबोटे, कुमार कुरतडीकर, देवानंद सरोदे, मुस्ताक अहेमद खान, नितीन बनसोडे, साहेबराव थोरात, के़ एच़ वने, कैलास वाघमारे, संदीप वने, गया कोकरे, गौतमी कावळे, अशोक कापसीकर, पांढरी जायनुरे, रामचंद्र सातव, श्याम निलंगेकर, एच़ पी़ कांबळे, रवी पंडित, जयदीप पैठणे, रोहन काहळेकर, डॉ़ सिद्धार्थ भेदे, प्रशांत गोडबोले, महेंद्र सोनकांबळे, एस़ के़ अहमद, अनिता कंधारे, विठ्ठल गायकवाड, भीमराव बेंद्रीकर, दिलीप जोंधळे आदींनी सहभाग घेतला़
ईव्हीएम हटाओ देश बचाओ मोहिमेअंतर्गत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
- उमरी : भारिप-बहुजन महासंघाच्या वतीने ईव्हीएम हटाओ देश बचाओ मोहिमेअंतर्गत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दिला.पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधितांना निवेदनही दिले.उमरी येथे भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष अरुण भद्रे आदी उपस्थित होते़
- किनवट येथेही आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रा.डॉ. हमराज उईके, तालुकाध्यक्ष जे.टी. पाटील, राजेंद्र शेळके, प्रा. किशन मिराशे, महासचिव दीपक ओंकार, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश तसेच भोकर येथे राज्य निवडणूक आयुक्त यांना तहसीलदार भरत सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.
- धर्माबाद: तहसीलसमोर भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष देवीदास पहेलवान, गंगाधर धडेकर, चांदोबा वाघमारे, गौतम देवके, नागेश कांबळे, मारोती कांबळे, निलेश वाघमारे, भगवान कदम आदी उपस्थित होते.