दिव्यांगांचे घरकुलासाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:14 AM2021-07-16T04:14:14+5:302021-07-16T04:14:14+5:30
यावेळी झालेल्या चर्चेत बीएसयूपी योजनेअंतर्गत बांधलेली घरे दिव्यांगांना वाटप करण्यासाठी महापालिकेने अर्ज मागवले आहेत. १ हजार २८ अर्ज ...
यावेळी झालेल्या चर्चेत बीएसयूपी योजनेअंतर्गत बांधलेली घरे दिव्यांगांना वाटप करण्यासाठी महापालिकेने अर्ज मागवले आहेत. १ हजार २८ अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांची छाननी सुरू आहे. सर्वसाधारण सभेनेही घरकुल वाटपाच्या ठरावाला मंजुरी दिली आहे. प्राप्त अर्जांची निकषाप्रमाणे अर्जांची छाननी करून अंतिम यादी ५ टक्क्यांप्रमाणे किंवा जास्तीचे घरकुल शिल्लक घरकुलांपेक्षा जास्त अर्जांची संख्या विचारात घेता सोडतीद्वारे वाटप करण्याची प्रक्रिया केली जाईल, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्याचवेळी दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या दिव्यांगांना सोडतीपासून सूट देण्याचा निर्णयही घेण्यात आला. दिव्यांगांचे प्रमाणपत्र तपासूनच घरकुल दिले जाईल, असेही यावेळी स्पष्ट केले. या चर्चेनंतर दिव्यांगांनी आंदोलन मागे घेतले.
बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात शोभाबाई शिंदे, प्रतिभा साळुंके, शेख आतिक, नागनाथ कामजळगे, राजकुमार देवकर, विठ्ठल सूर्यवंशी आदी सहभागी झाले होते.