खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2023 12:34 PM2023-04-28T12:34:57+5:302023-04-28T12:35:14+5:30

घरात पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आलेत.

MP Pratap Patil Chikhlikar inspected the damaged area in nanded | खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

googlenewsNext

नांदेड जिल्ह्यातील नायगाव, मुखेड, लोहा, कंधारसह इतर तालुक्यात गारपीट, वादळी वाऱ्यासह मागील तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडले आहेत. त्यामुळे नांदेड-हैद्राबाद महामार्गाची एकेरी वाहतूक सुरू झाली आहे.

घरावरचे छप्पर उडालेत, नायगाव तालुक्यातील कहाळा येथे भिंत कोसळून एकजण ठार तर तीन जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर घरात पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आलेत. तसेच शेतकाऱ्यांचेही यात आतोनात नुकसान झाले आहे. अनेक गावातील पोल उन्मळून पडल्याने मागील तीन दिवसांपासून वीज गेली आहे. त्या गावांना खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भेटी देत नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Web Title: MP Pratap Patil Chikhlikar inspected the damaged area in nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.