महावितरण कर्मचाऱ्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:14 AM2021-07-18T04:14:06+5:302021-07-18T04:14:06+5:30

बारडमध्ये मटका अड्ड्यावर धाड नांदेड : बारड बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या टाइम बाजार नावाच्या मटका अड्ड्यावर पाेलिसांनी धाड टाकली. ...

MSEDCL employee beaten | महावितरण कर्मचाऱ्यास मारहाण

महावितरण कर्मचाऱ्यास मारहाण

Next

बारडमध्ये मटका अड्ड्यावर धाड

नांदेड : बारड बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या टाइम बाजार नावाच्या मटका अड्ड्यावर पाेलिसांनी धाड टाकली. शुक्रवारी टाकलेल्या या धाडीत राेख ४ हजार २६० रुपये व मटक्याचे साहित्य पकडण्यात आले. उपनिरीक्षक सुभाष वानाेळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बारड ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दुचाकी चाेरी

नांदेड : नवीन नांदेडातील धनेगाव येथून चाेरट्याने एम.एच. २६ बी.आर. १५८८ क्रमांकाची दुचाकी लंपास केली. राजेश गणेश घंटेवार या चालकाने आपली दुचाकी एका दुकानासमाेर उभी केली हाेती. चाेरट्यांनी संधी साधून ती लंपास केली. नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल केला.

विवाहितेची आत्महत्या, सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा

नांदेड : मूलबाळ हाेत नसल्याने सासरच्या मंडळीनी छळ केल्याने किनवट तालुक्यातील हुडी येथे पार्वतीबाई गंगाधर खाेकले (२८) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हुडी येथील पार्वतीबाई गंगाधर खाेकले या विवाहितेला सासरी मूलबाळ हाेत नसल्याने शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. या छळास कंटाळून पार्वतीबाई आपल्या माहेरी आल्या हाेत्या. सासरच्या मंडळींनी केलेल्या छळास कंटाळून त्यांनी १३ जुलै राेजी गळफास घेतला. याप्रकरणी कमलबाई शिरडे यांच्या तक्रारीवरून इस्लापूर ठाण्यात सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: MSEDCL employee beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.