मुदखेड रेल्वे भुयारी मार्ग रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:47 AM2018-12-28T00:47:51+5:302018-12-28T00:48:41+5:30

शहरातील मुख्य प्रश्न म्हणजे रेल्वे भुयारी मार्ग या प्रश्नावर सर्वपक्षीय संघटनांनी एकत्र येऊन नगरपरिषदे समोर आंदोलन करण्याची तयारी दर्शविली आहे.

Mudkhed railway crossing the subway | मुदखेड रेल्वे भुयारी मार्ग रखडला

मुदखेड रेल्वे भुयारी मार्ग रखडला

googlenewsNext
ठळक मुद्देसर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिक आंदोलनाच्या तयारीत

मुदखेड : शहरातील मुख्य प्रश्न म्हणजे रेल्वे भुयारी मार्ग या प्रश्नावर सर्वपक्षीय संघटनांनी एकत्र येऊन नगरपरिषदे समोर आंदोलन करण्याची तयारी दर्शविली आहे. रेल्वे भुयारी मार्ग या प्रश्नावर सर्वपक्षीय संघटना एकत्र येऊन मुदखेड नगरपरिषदेवर मोर्चा काढण्याची तयारी करत आहेत.
केंद्र सरकारच्या वतीने रेल्वेचे काम करत असताना भुयारी मार्गस्त पुलाचे काम करुन रेल्वेचे काम पुढे घेऊन गेले परंतु या ठिकानाहुन शहरातील वाहतुकीसाठी पयार्यी मार्ग म्हणून भुयारी मार्ग उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले परंतु अजूनही हा भुयारी मार्ग चालु झालेला नाही.
भुयारी मागार्चा प्रश्न जैसे थे अवस्थेत असुन यामुळे शहरातील वाहन धारकांना, नागरिकांना, रुण्णांना, विद्यार्थ्यांना, बुजुर्गांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
शहरातील सर्व संघटनेतील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन रेंगाळलेल्या भुयारी मार्ग प्रश्नावर संबंधित प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे सांगितले. मुदखेड शहरातील भुयारी मार्ग हा प्रश्न शहरवासियांच्या जिव्हाळा असून या प्रश्नावर राजकारण करू नये.असे अनेकांचे म्हणणे आहे.

भुयारी मार्गाचे काम सत्ताधाऱ्यांच्या अंतर्गत गटबाजीमुळे रखडलेले आहे. काम चालु व्हावे अशी आमची अपेक्षा आहे -शेख जब्बार, राष्ट्रवादी शहराध्यक्ष

या कामात अतिक्रमण झालेली जमिन अधिग्रहन करण्याचे अधिकार शासनाकडे असताना अतिक्रमन धारकांना तोंड पाहून नोटिसा दिल्या जात आहेत. अतिक्रमण केलेल्यांना मावेजा दिला जात आहे.तर काही आश्वासने देत जागा खाली करण्याचे तोंडी सांगत आहेत.हे दुदैवी बाब आहे. -अ‍ॅड कमलेश चौदंते, नगरसेवक न.प.मुदखेड

भूयारी मार्ग या कामाचे अजूनही कुठलेही काम झालेले नसल्यामुळे पितळ उघडे पडले आहे. -प्रवीण गायकवाड, भोकर विधानसभा अध्यक्ष भाजपा

शहरातील रेल्वे भुयारी मार्ग हा जनसामान्यांचा प्रमुख प्रश्न आहे हे माझ्या लक्षात आहे.शहरातील सर्व कामे लवकरच चालु होतील.अजुन जनतेनी थोडा वेळ द्यावा ही अपेक्षा आहे -मुजीब अन्सारी जहांगीरदार, नगराध्यक्ष न.प.मुदखेड

माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी शहरातील भुयारी मागार्ची समस्या तात्काळ सोडवावी. शहरातील अतिक्रमणे काढून जनसामान्य नागरिकांसाठी रेल्वे भुयारी मार्ग चालु करावा -मारोतराव पाटील, अ‍ॅटो चालक व व्यापारी

मुदखेड नगराध्यक्ष यांनी निर्भीडपणे अतिक्रमण केलेल्यांवर कडक कार्यवाही करून अतिक्रमणे काढून रेल्वे भुयारी मार्ग चालू करावा -देविदास गायकवाड, वाहन चालक नागरिक मुदखेड

Web Title: Mudkhed railway crossing the subway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.