मुदखेडला दुचाकी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:28 AM2020-12-05T04:28:04+5:302020-12-05T04:28:04+5:30
विवाहितेचा छळ हदगाव - चारित्र्याच्या संशयावरून २१ वर्षीय विवाहितेचा छळ केल्याच्या आरोपावरून मनाठा पोलिसांनी सासरच्या मंडळीविरूद्ध गुन्हा नोंदवला. आरोपींनी ...
विवाहितेचा छळ
हदगाव - चारित्र्याच्या संशयावरून २१ वर्षीय विवाहितेचा छळ केल्याच्या आरोपावरून मनाठा पोलिसांनी सासरच्या मंडळीविरूद्ध गुन्हा नोंदवला. आरोपींनी चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेला घराबाहेरही हाकालले होते. या घटनेची फिर्याद विवाहितेने मनाठा ठाण्यात दिली.
अर्धापूरला घरफोडी
अर्धापूर - येथील लंगडे कॉम्प्लेक्समधील दिपाली लंगडे या कुटुंबीयासह वरच्या मजल्यावरील घरात झोपी गेले होते. दरम्यान खालच्या मजल्यावरील जुन्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. लोखंडी पेटीतील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, एलईडी टीव्ही असा एकूण १ लाख २० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. अर्धापूरचे पोलीस निरीक्षक राठोड तपास करीत आहेत.
आमरण उपोषण
नायगाव - गडगा ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या हेराफेरीची चौकशी करून संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे नोंदवावेत या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते रामदास भाकरेयांनी गडगा ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. याच मागणीसाठी त्यांनी यापूर्वी संबंधितांना वारंवार लेखी निवेदन देऊनही वरिष्ठांनी कारवाई केली नाही, असा आरोप भाकरे यांनी केला आहे.
महातपासणी शिबिर
किनवट - अखिल भारतीय दिव्यांग कामगार संघटनेच्या वतीने गुरुवारी दिव्यांग दिनानिमित्त महातपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी आ.भीमराव केराम, राष्ट्रीय अध्यक्ष अरुण गव्हाणे, भाजपाचे संदीप केंद्रे, ज्योतीबा खराटे, नगराध्यक्ष आनंद बच्चेवार, अनिल तिरमनवार, प्रवीण मॅकलवार, अनिरूद्ध केंद्रे, बालाजी मुरकुटे, के.मूर्ती, गजानन कोल्हे आदी उपस्थित होते. आयोजक राजू माहूरकर, संयोजक अब्दुल कलाम, गजानन कोतापेल्लीवार यांनी यासाठी परिश्रम घेतले.
तरुणीचा मृत्यू
नांदेड - काळेश्वर मंदिराशेजारील गोदावरी नदीपात्रात बुडून वैष्णवी पांडुरंग सरोदे (वय १९) या युवतीचा मृत्यू झाल्याची घटना १ डिसेंबर रोजी दुपारी घडली. ती काळेश्वर येथे गेली होती. दुपारी ४ वाजता ही घटना घडली. ग्रामीण पोलिसांनी पांडुरंग सरोदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवला आहे.
एडस् जनजागृती शिबीर
बिलोली - ग्रामीण रुग्णालयांतर्गत तुकाराम सूर्यवंशी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व आदर्श शिक्षक प्रसारक मंडळाच्या वतीने एडस् जनजागृती सप्ताहाचे औचित्य साधून एकदिवसीय तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी देविदास भोईवार, शेख अंसार, अविनाश किन्हाळकर, कुलदीप सूर्यवंशी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला सिद्धार्थ भुरे, बालाजी भालेराव, मारोती शृंगारे, काशीनाथ वाघमारे आदी उपस्थित होते.
हरणांचा वावर
धर्माबाद - तालुक्यातील शेतशिवारात हरभरा पीक जोमाने आले असताना दुसरीकडे या पिकात हरणांच्या कळपाचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. रब्बी हंगामात प्रामुख्याने हरभराची पेरणी ७० ते ८० टक्के झाली. हे पीक जोम धरीत आहे. यातच हरणाच्या कळपामुळे पिकाचे मोठे नुकसान होत आहे.