मुगट प्रा. आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:16 AM2021-01-17T04:16:12+5:302021-01-17T04:16:12+5:30
यावेळी जि. प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, उपाध्यक्षा पद्मा रेड्डी, पशुसंवर्धन दुग्धविकास विकास सभापती बाळासाहेब रावणगावकर, जिल्हा परिषद सदस्य ...
यावेळी जि. प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, उपाध्यक्षा पद्मा रेड्डी, पशुसंवर्धन दुग्धविकास विकास सभापती बाळासाहेब रावणगावकर, जिल्हा परिषद सदस्य अरुणा कल्याणे, तहसीलदार दिनेश झांपले, नायब तहसीलदार संजय नागमवाड, संचालक भीमराव कल्याणे, सभापती बालाजी सूर्यतळे, बीडीओ जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, डॉ. विद्या झिने, डॉ. राजेंद्र पवार, डॉ. संजय कासराळीकर, डॉ. सरस्वती बेन्दगुडे, डॉ. अश्लेशा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोना लसीकरणाचा पहिला डोस आरोग्य कर्मचारी मो. खैसर यांना देण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कोरोनाच्या लसीकरणासाठी मुगट प्राथमिक आरोग्य केंद्र व कर्मचारी सज्ज झाले आहेत.
कोरोना लसीकरणाच्या या पहिल्या टप्प्यामध्ये कोरोना काळात काम केलेल्या वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती, तसेच फ्रंट लाईन कोविड वारियर्स यांचा समावेश असणार आहे.
या लसीकरणासाठी मुगट प्राथमिक आरोग्य केंद्राकडून तीन टीमची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कासराळीकर, डॉ. अश्लेशा जाधव, डॉ. सरस्वती बेन्दगुडे, सुरेखा गाडेकर, राजकुमार साळवे, यु. बी. कुराडे, पुष्पराज राठोड, मो. खैसर, अरुणा कुरुडे, रेखा हाटकर, पी. डी शेंबेटवाड, आदी कर्मचाऱ्यांच्या समावेश करण्यात आला आहे.