मुक्ता साळवे धर्म आणि जातीअंताच्या लढ्यातील अग्रणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:14 AM2021-01-09T04:14:21+5:302021-01-09T04:14:21+5:30
नांदेड - महात्मा ज्योतीराव फुले यांनी हजारो वर्षांपासून वंचित असलेल्या अस्पृश्य बांधवांना ज्ञानरुपी औषध दिले. त्यांनी सुरु केलेल्या ...
नांदेड - महात्मा ज्योतीराव फुले यांनी हजारो वर्षांपासून वंचित असलेल्या अस्पृश्य बांधवांना ज्ञानरुपी औषध दिले. त्यांनी सुरु केलेल्या शाळेमुळे मातंग समाजातील मुक्ता साळवे घडल्या. बालवयात असतानाच अस्पृश्य समाजाला मिळणारी तुच्छ वागणूक पाहून त्यांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून मांग-महारांचा धर्म कोणता? असा प्रश्न तत्कालिन समाजाला केला. १९ व्या शतकात सर्वात प्रथम मुक्ता साळवे यांनी मांग-महारांच्या दु:खाविषयीचा निबंध लिहून जात आणि धर्माचा खरपूस समाचार घेतला. त्यामुळे मुक्ता साळवे या धर्म आणि जातीअंताच्या लढ्यातील अग्रणी ठरतात, असे प्रतिपादन प्रा. सदाशिव भुयारे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आयोजित केलेल्या लाईव्ह व्याख्यानमालेत केले.
प्रा. भुयारे म्हणाले, मुक्ता साळवे यांनी त्याकाळात दिलेला लढा प्रेरणादायी आहे. साळवे या त्यांच्या कर्तृत्वाने मानवमुक्तीच्या लढ्यातील अग्रणी ठरतात. संस्थापक अध्यक्ष डॉ. विठ्ठल भंडारे यांनी ही फेसबुक लाईव्ह व्याख्यानमाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून ते क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या स्मृतिदिनापर्यंत चालणार असल्याचे सांगून यात महाराष्ट्रातील नामवंत वक्ते मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले. या व्याख्यानमालेचे कार्यकारी संयोजक डॉ. राज ताडेराव हे आहेत. व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी डॉ. माधव बसवंते, डॉ. सुरेश चौथाईवाले, डॉ. संभाजी बिरांजे, डॉ. सारिका भंडारे, छाया बेले, ज्ञानेश्वर ननुरे, डॉ. मोहन लोंढे, डॉ. किशोर जोगदंड, प्रा. अरुण आलेवार, लक्ष्मण डोके, प्रा. गणपत चिवळीकर, डॉ. प्रज्ञाकुमार गाथाडे, सागर रंधवे, प्रा. जगदीश राणे, प्रा. मनोज कांबळे परिश्रम घेत आहेत.