काेराेनातील फायलींचा मुंबई-दिल्ली-पुणे प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:22 AM2021-09-12T04:22:24+5:302021-09-12T04:22:24+5:30
मुंबई, नांदेड, औरंगाबाद, अंबाजाेगाई येथील शासकीय रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या व काेराेनात सेवा बजावताना मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना तर अक्षरश: ...
मुंबई, नांदेड, औरंगाबाद, अंबाजाेगाई येथील शासकीय रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या व काेराेनात सेवा बजावताना मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना तर अक्षरश: वैताग आला आहे. आधीच कुटुंबातील सदस्य गमावला त्याचे दु:ख, वरून दाव्यांसाठी मंजुरी मिळविताना त्यांच्या नाकीनऊ आले आहेत.
चाैकट....
शासकीय यंत्रणेच्या चुकीचा फटका
एवढेच नव्हे, तर शासकीय यंत्रणेच्या चुकीमुळे या वारसदारांना वर्षभरापासून विमा दाव्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. मृताच्या वारसांना ५० लाखांचा विमा दावा मिळविण्याची ही फाइल पुण्याला प्रधानमंत्री गरीब कल्याण याेजनेच्या कार्यालयात पाठविणे गरजेचे असताना यंत्रणेने प्रत्यक्षात ती मुंबईला पाठविली. तेथून ती थेट दिल्लीला पाठविली गेली. काेणतीही खातरजमा न करता ही फाइल थेट दिल्लीत आल्याची चूक लक्षात आल्यानंतर ती फाइल पुण्याला पाठविली गेली.
चाैकट...
आता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत फाइल मागितली
फायलीच्या या मुंबई-दिल्ली-पुणे प्रवासातच जणू वर्ष निघून गेले. आता या फायली परत पाठविण्यात आल्या आहेत. तुमच्याकडे काेराेनाकाळात सेवा बजावण्याबाबत आदेश आहेत का, अशी विचारणा करण्यात आली आहे. ताे आदेश असेल तर संपर्कात आलेल्या रुग्णांच्या यादीसह आता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पुन्हा फाइल पाठविण्याचे सुचविण्यात आले आहे.
शासकीय यंत्रणेच्या चुका व जाचक अटी यामुळे काेराेना बळी ठरलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचे वारसदार त्रस्त झाले आहेत. सरकारने जाचक अटी दूर करून तातडीने मृतांच्या वारसांना न्याय द्यावा, अशी मागणी हाेत आहे.