दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 01:03 PM2020-09-25T13:03:21+5:302020-09-25T13:04:02+5:30
याप्रकरणी शुक्रवार दि. २५ रोजी पहाटे मयताच्या नातेवाईकाने दिलेल्या फिर्यादी वरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पो नि गोवर्धन भुमे पुढीत तपास करीत आहेत.
पूर्णा : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून, एका २२ वर्षीय तरुणाचा गळा चिरून खून केल्याची घटना दि. २४ सप्टेंबर रोजी पुर्णा येथे घडली. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हरिनगर भागात राहणारा मयत नितीन गणेश खर्गखराटे याला गुरुवारी सायंकाळी पंचशील नगर परिसरातील विकास बापूराव चौदनते व रोशन नाथा इंगोले या दोघांनी फोन करून रेल्वे क्वार्टर परिसरात बोलावून घेतले. दारू पिण्यासाठी पैसे देत नाही, म्हणून त्यास बळजबरी दारू पाजून मारहाण केली व विकास याने जवळील धारदार कटरने त्याच्या गळ्यावर वार केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कर्डीले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी शुक्रवार दि. २५ रोजी पहाटे मयताच्या नातेवाईकाने दिलेल्या फिर्यादी वरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पो नि गोवर्धन भुमे पुढीत तपास करीत आहेत.