संगीत शंकर दरबारला आजपासून प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:33 AM2019-02-25T00:33:04+5:302019-02-25T00:34:00+5:30
शहरात संगीत शंकर दरबार या शास्त्रीय गायन, वादन कार्यक्रमास २५ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. या कार्यक्रमात संगीत शंकर दरबार पूर्वसंध्या कार्यक्रमात सोमवारी सूर नवा, ध्यास नवा या स्पर्धेतील विजेते स्वराली जाधव व इतर छोटे सूरवीरांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सुजया व श्रीजया अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
नांदेड : शहरात संगीत शंकर दरबार या शास्त्रीय गायन, वादन कार्यक्रमास २५ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. या कार्यक्रमात संगीत शंकर दरबार पूर्वसंध्या कार्यक्रमात सोमवारी सूर नवा, ध्यास नवा या स्पर्धेतील विजेते स्वराली जाधव व इतर छोटे सूरवीरांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सुजया व श्रीजया अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
शहरातील यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी ६ वाजता सोमवारी पूर्वसंध्या कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन अभिनेत्री स्पृहा जोशी या करणार आहेत. २६ फेब्रुवारी रोजी पहिल्या सत्रात सकाळी ११ ते १ या वेळेत कुसुम सभागृहात भार्गवी देशमुख हिचे कथ्यक नृत्य, स्वराली जोशी आणि साईप्रसाद पांचाळचे शास्त्रीय गायन होणार आहे.
द्वितीय सत्रात यशवंत महाविद्यायाच्या प्रांगणात संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल महामहोपाध्याय डॉ. कमलाकर परळीकर यांना आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रा. शेषराव मोरे यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.
अध्यक्षस्थानी खा. अशोकराव चव्हाण, उद्घाटक म्हणून पंडित मुकुल शिवपुत्र यांची तर प्रमुख उपस्थिती डॉ. गिरीष गांधी यांची राहणार आहे. यावेळी एस. आकाश (बासरी) यज्ञेश रायकर (व्हायोलीन) व इशान घोश (तबला) यांची त्रिभुक्ती हा जुगलबंदीचा कार्यक्रम संगीत शंकर दरबारमध्ये होणार आहे.