बिलोली, भोकर येथे मुस्लिमांचा मूक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:46 AM2018-12-07T00:46:27+5:302018-12-07T00:47:07+5:30
बाबरी मशिद पुर्वीच्याच ठिकाणी बांधण्यात यावी, अशी मागणी बिलोली तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी एका निवेदनाद्वारे राष्ट्रपती कोविंद यांच्याकडे केली असून गुरूवारी शहरात मूक मोर्चा काढण्यात आला़
बिलोली : बाबरी मशिद पुर्वीच्याच ठिकाणी बांधण्यात यावी, अशी मागणी बिलोली तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी एका निवेदनाद्वारे राष्ट्रपती कोविंद यांच्याकडे केली असून गुरूवारी शहरात मूक मोर्चा काढण्यात आला़
मुस्लिम समाजाची पवित्र बाबरी मशीद ६ डिसेंबर १९९२ रोजी उद्ध्वस्त करुन मुस्लिम व इस्लाम धर्माच्या भावना दुखावल्या. या घटनेचा निषेध व्यक्त करीत बिलोली येथे मुस्लीम बांधवाकडुन मूक मोर्चा काढण्यात आला़ या मूक मोर्चात कुंडलवाडी, मुतन्याळ, रामतीर्थ, कासराळी यासह परीसरातील असंख्य मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला़ येथील तहसील समोर मुस्लीम बांधवांना मौलाना मुबिन खान, मौलाना अहेमद बेग इनामदार, सुलेमान शेख, पाशाभाई गादीलगे, वलिओद्दीन फारुखी आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या़ यावेळी पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी चोख पोलीस ठेवला होता. सूत्रसंचालन ए. जी. कुरेशी यांनी केले़ अहेमद मौलाना यांनी दुवा करुन मोर्चाची सांगता केली़
यशस्वीतेसाठी नगरसेवक जावेद कुरेशी, शाहेद बेग, अमजद चाऊश, शफी बिल्डर, मैनोद्दिन शेख, बाबा कुरेशी, दादेसहाब कुरेशी, गफ्फार कुरेशी, रहिम कुरेशी, समिर पटेल, जुबेर पटेल,नोमान फारुखी, अ.अतीख अ.हफीज, फराज पटेल यांच्यासह अनेक मुस्लिम बांधवांनी सहकार्य केले आहे.
शहरातील प्रतिष्ठाने बंद
शहरातील मुस्लिम समाजाने आपली दुकाने, हॉटेल, पानटपरी, मेडिकल आदी दुकाने बंद करुन सदरील घटनेचा निषेध केला आहे. या मोर्चात तालुक्यातील कासराळी, कुंडलवाडी, रामतीर्थ, बडूुर, मुतन्याळ आदी गावातील अनेक मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.
भोकर येथे मुस्लिम समाजाची मूक रॅली
भोकर : बाबरी मशिद पाडल्यानंतर भारतीय मुस्लिम समाजाची मने दुखावली गेली. यासाठी बाबरी मशिद पुन्हा त्याच ठिकाणी बांधण्यात यावी, यामागणीचे निवेदन जमियत उलैमा ए हिंद च्या वतीने उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांना गुरुवारी देण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिमांनी आपली दुकाने बंद ठेवून बाबरी मशिद त्याच ठिकाणी बांधण्यात यावी, या मागणीसाठी मक्का मशिद सोहराबपुरा येथुन तहसील कार्यालयापर्यंत मूक रॅली काढली़ रॅलीत जमियत ए उलैमा चे मौलाना मुबिन खाँन, शेख युसुफ, काजी जमील, मौलाना हाफिज, कामरान हाफिज, शुजाऔद्दिन हाफिज, सद्दाम काजी, मौलाना मस्लियोद्दीन, अॅड. मुजाहेद शेख, अॅड. अल्तमश, हमीद खान पठाण, जवाजोद्दिन बडबडेकर, शमीमोद्दिन ईनामदार, अहेमद करखेलीकर, सऊद गौंदवाले, नाजिम बाबा, सय्यद जुनेद, बाबा खाँन, सनाओद्दीन ईनामदार, अफसर भाई, जुनेद पटेल, रफीख खतीब, ईरशाद पठान, आसिफ तामसेकर आदी सहभागी झाले़