बहुभाषिक ऑनलाईन कविसंमेलनात माय मराठीचा बोलबाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:22 AM2021-07-07T04:22:31+5:302021-07-07T04:22:31+5:30
या कविसंमेलनात सर्वाधिक कवी-कवयित्रींनी मराठी कविता सादर करीत माय मराठीचाच बोलबाला कायम राखला, तर कोणत्याही भारतीय भाषेचा आम्ही आदरच ...
या कविसंमेलनात सर्वाधिक कवी-कवयित्रींनी मराठी कविता सादर करीत माय मराठीचाच बोलबाला कायम राखला, तर कोणत्याही भारतीय भाषेचा आम्ही आदरच करतो, पण माय मराठीला दुय्यम समजू देणार नाही, असा एकूणच कविसंमेलनाचा सूर होता.
कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिरीष लांडगे होते. नवी दिल्ली येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश कर्दम यांच्याहस्ते उद्घाटन संपन्न झाले. यावेळी डॉ. लोकेश कुमार गुप्ता - नवी दिल्ली, कैलास मण्डेला - राजस्थान, डॉ. आरिफ महात - कोल्हापूर, डॉ. सुशिला टाकभोरे - नागपूर, डॉ. बी. डब्ल्यू. गायकवाड - मुंबई, डॉ. संदीप सांगळे - पुणे, डॉ. हनुमंत भोपाळे - नांदेड यांची प्रमुख उपस्थिती होती. या संमेलनात राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाणा आदी राज्यांतील कवींनी सहभाग नोंदविला.
भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून कविसंमेलनास प्रारंभ झाला. हे वाचन आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ कवी तथा सप्तरंगी साहित्य मंडळाचे महासचिव पांडुरंग कोकुलवार यांनी केले. स्वागताध्यक्ष तथा मुख्य आयोजक डॉ. प्रदीप पंडित यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी डॉ. जयप्रकाश कर्दम, डॉ. कैलास मण्डेला, डॉ. सुशिला टाकभोरे, डॉ. अशोक पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन प्रा. रेखा गायकवाड आणि मनोहर गायकवाड यांनी केले, तर आभार बाबूराव पाईकराव यांनी मानले. तांत्रिक साहाय्य मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. नंदकुमार चंदन आणि उपप्राचार्य डॉ. बी. डब्ल्यू. गायकवाड यांनी केले. तसेच सप्तरंगी साहित्य मंडळाच्या पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घेतले.
सहभागी कवी, कवयित्रींना सहभागिता प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीनेच दिल्याचे संयोजन समितीचे अध्यक्ष गंगाधर ढवळे यांनी सांगितले.