माझी खासदारकी बहुजन समाजासाठीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:50 AM2018-03-24T00:50:04+5:302018-03-24T11:19:52+5:30

बहुजन चळवळीत काम करीत असताना राष्ट्रपतींच्या कोट्यातून सन्मानपूर्वक मिळालेल्या खासदारकीचा उपयोग बहुजन समाजासाठीच करीत आहे़ आजपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याबरोबरच दिल्ली दरबारी फुले, शाहु, आंबेडकरांचा महाराष्ट्राचा वारसा अविरत रहावा म्हणूनच यंदाचा शिवजन्मोत्सव दिल्लीत केला, असे प्रतिपादन खा़युुवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले़

My MP is for the Bahujan Samaj | माझी खासदारकी बहुजन समाजासाठीच

माझी खासदारकी बहुजन समाजासाठीच

Next
ठळक मुद्देस्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे महाअधिवेशन : युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : बहुजन चळवळीत काम करीत असताना राष्ट्रपतींच्या कोट्यातून सन्मानपूर्वक मिळालेल्या खासदारकीचा उपयोग बहुजन समाजासाठीच करीत आहे़ आजपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याबरोबरच दिल्ली दरबारी फुले, शाहु, आंबेडकरांचा महाराष्ट्राचा वारसा अविरत रहावा म्हणूनच यंदाचा शिवजन्मोत्सव दिल्लीत केला, असे प्रतिपादन खा़ युुवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले़

स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्यावतीने आयोजित महाअधिवेशनात ते बोलत होते़ मंचावर संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, अ‍ॅड़महेश भोसले, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष संतोष गव्हाणे पाटील, प्रदेशाध्यक्ष माधव देवसरकर, श्यामसुंदर शिंदे, विठ्ठल पावडे, भागवत देवसरकर, डॉ़अंकुश देवसरकर, अविनाश कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती़ प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले़

खा़ संभाजीराजे भोसले म्हणाले, फुुले, शाहु, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा असणाºया महाराष्ट्रात कोपर्डी, भीमा कोरेगावसारख्या घटना घडणे हे दुर्दैवं आहे़ भीमा कोरेगावमधील घटनेला कारणीभूत असणाºयांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्यासंदर्भात आपण राज्यसभेत प्रश्नदेखील उपस्थित केल्याचे त्यांनी सांगितले़ जगभरात शिवजन्मोत्सव साजरा होत असताना दिल्लीतही हा सोहळा साजरा करण्याची इच्छा खासदार असल्यामुळे पूर्ण झाली़ राष्ट्रपती भवन परिसरात झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्याचे महाराष्ट्रातील हजारो नागरिकांना साक्षीदार करता आल्याचे त्यांनी सांगितले़ या कार्यक्रमास राष्ट्रपतींसह लष्कर, नवदल प्रमुखांसह अनेक दिग्गजांची उपस्थिती होती़ यानिमित्ताने राष्ट्रपतींना दिलेली शिवरायांची भव्य प्रतिमा राष्ट्रपती भवनात दिमाखात लावण्यात आली. शेतकºयांचे प्रश्न आपण प्रायव्हेट मेंबर बिलाच्या माध्यमातून मांडणार आहोत़ त्याचबरोबर शेतकरी प्रश्न, मराठा आरक्षण या विषयावर महाराष्ट्रातील शिष्टमंडळ घेवून आपण मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे खा़संभाजीराजे भोसले यांनी सांगितले़

प्रदेशाध्यक्ष माधव देवसरकर यांनी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वाटचालीविषयी माहिती दिली. संस्थापक अध्यक्ष संतोष गव्हाणे यांनी छत्रपती शिवरायांची बदनामी करणाºया कुमार केतकर यांना राज्यसभेची उमेदवारी देणाºया काँग्रेसचा निषेध केला़ तसेच कोरेगाव भीमा घटनेप्रकरणी भीडेंना कधी अटक करणार असा सवाल केला़ तरूणांनी हातात दगड न घेता पेन घेवून लढा उभारावा, असे आवाहनही केले़ प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष गणेश शिंदे यांनी केले़ सूत्रसंचालन सोपान कदम आणि मुक्ताई पवार यांनी केले़ यशस्वीतेसाठी उत्तरचे जिल्हाध्यक्ष गणेश शिंदे, दक्षिणचे बालाजी जाधव, ग्रामीणचे बालाजी शिंदे, महानगराध्यक्ष राहुल धुुमाळ, आेंकार सूर्यवंशी तळणीकर, योगेश्वर शिंदे, स्वप्नील सूर्यवंशी, संदीप चव्हाण, अवधुत कदम, राज मोरे, सदा पुयड, गुणवंत तिडके, माधव शिंदे आदींनी परिश्रम घेतले़ जिल्हाध्यक्ष बालाजी शिंदे यांनी आभार मानले़

कार्यकर्त्यांनी कायदा हातात न घेता काम करण्याची गरज
सामाजिक संघटनेत काम करताना गुन्हा दाखल झाला तर तो काही वेगळा नसतो़ म्हणून कार्यकर्त्यांना कायदा हातात न घेता कार्य करावे, असे आवाहन गायकवाड यांनी केले़ दरम्यान, छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी पुढाकार घेवून पहिल्यांदाच दिल्लीत राजपथावर शिवजयंती मराठेशाही पद्धतीने साजरी केल्याबद्दल त्यांचे गायकवाड यांनी स्वागत केले़ यावेळी अ‍ॅड़महेश भोसले यांनी शेतकरी विरोधी कायद्यांवर मार्गदर्शन केले़ १९५० पासून आलेल्या काही कायद्यामुळे शेतकरी हा संवैधानिकरित्या भारतीय नागरिक होत नाही, असे मत त्यांनी मांडले़

प्रवीण गायकवाड मार्गदर्शन करताना म्हणाले, प्रतिष्ठेपोटी आर्थिकसंपन्नता असलेली व्यक्ती राजकारणात येवून समाजाचे प्रश्न सुटत नाहीत़ त्यामुळे सामाजिक चळवळीत झटलेले कार्यकर्ते राजकारणात येणे गरजेचे आहे़ युवराज संभाजीराजे आज खासदार असल्याने ते राज्यसभेत आपले प्रश्न मांडू शकतात़ खºया अर्थाने फुले, शाहु, आंबेडकर यांच्या वारसा घेवून छत्रपती संभाजी महाराज काम करीत असल्याचे ते म्हणाले़ आजच्या तरूणांना भावनिक आंदोलनावर खिळवून ठेवण्याचे काम सुरू असून तरूणांनी यापासून सावध राहिले पाहिजे़

Web Title: My MP is for the Bahujan Samaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.