नांदेड जिल्ह्यात माझी शाळा, माझी टेकडी उपक्रम राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:20 AM2018-06-15T00:20:54+5:302018-06-15T00:21:12+5:30
बांधकाम विभागातर्फे केलेल्या स्ट्रक्चरल आॅडीटमध्ये जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ३ हजार ७७६ पैकी ४७४ वर्गखोल्या मोडकळीस आल्याचे स्पष्ट झाले होते. यातील ४७ वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असून उर्वरित दुरुस्ती संबंधीचा निर्णय सप्टेंबरमध्ये घेणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : बांधकाम विभागातर्फे केलेल्या स्ट्रक्चरल आॅडीटमध्ये जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ३ हजार ७७६ पैकी ४७४ वर्गखोल्या मोडकळीस आल्याचे स्पष्ट झाले होते. यातील ४७ वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असून उर्वरित दुरुस्ती संबंधीचा निर्णय सप्टेंबरमध्ये घेणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या शाळा-इमारतीचे बांधकाम विभागातर्फे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होते. यात ३ हजार ७७६ पैकी तब्बल ४७४ वर्गखोल्या नादुरुस्त असल्याचे आढळून आले होते. या वर्गखोल्यांची दुरुस्ती कुठून करायची ? असा प्रश्न होता. मात्र आता नादुरुस्त वर्गखोल्यांचा प्राधान्यक्रम ठरवून ज्या वर्गखोल्या धोकादायक अवस्थेत आहेत, अशा ४७ वर्गखोल्यांची दुरुस्ती तातडीने हाती घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी डीपीसीचा सन २०१७-१८ मधील ५० लाखांचा निधी वापरण्यात येणार असल्याचे काकडे यांनी सांगितले. दरम्यान, २०१८-१९ या वर्षीसाठीही डीपीसीमधून १ कोटी ८४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. हा निधी उर्वरित वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी वापरण्याचा निर्णय सप्टेंबरपर्यंत घेऊन या खोल्यांचीही प्राधान्याने दुरुस्ती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व ४७४ वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी पुरेसा निधी नसला तरी पहिल्या टप्प्यात ४७ आणि दुसऱ्या टप्प्यात वर्गखोल्यांच्या अवस्थेवरुन प्राधान्यक्रम ठरवून दीडशे वर्गखोल्या दुरुस्त करण्यात येतील, असे ते म्हणाले.
दरम्यान, वृक्षारोपणाचा कार्यक्रम अधिक व्यापक स्वरुपात राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. विभागीय आयुक्तांनी शाळा परिसरातील टेकड्या हिरव्यागार करण्यासाठी ‘माझी शाळा, माझी टेकडी’ हा उपक्रम हाती घेण्याची संकल्पना मांडली आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या पुढाकाराने शाळा परिसरातील टेकड्या हिरव्यागार करण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचे सांगत यासाठी गटशिक्षणाधिकाºयांची बैठकही घेण्यात आली असून लवकरच हा उपक्रम जिल्हाभरावर राबविण्यात येणार असल्याची मािहती काकडे यांनी दिली. दरम्यान, शुक्रवारी नवे शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर अधिकाºयांसह गटशिक्षणाधिकाºयांच्या बैठका पार पडल्या असून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी अधिकारी शाळांमध्ये उपसिथत राहणा आहेत.
---
शंभर दिवस द्या
जिल्हा परिषदेचा पदभार नुकताच हाती घेतला आहे. सध्या विविध विभागांच्या कामांचा आढावा घेत आहे. प्रलंबित असलेली कामे मार्गी लावण्यासाठीचे विशेष नियोजन सुरु असून जिल्हा परिषदेच्या कामकाजात सकारात्मक बदल करण्यासाठी शंभर दिवसांचा कालावधी द्या, असे सीईओ काकडे यांनी सांगितले.