Video:'एकच इच्छा बायको,मुलांना घरी आणा'; तरुणाचे जलकुंभावर शोले स्टाईल आंदोलन

By शिवराज बिचेवार | Published: January 20, 2023 11:52 AM2023-01-20T11:52:57+5:302023-01-20T11:56:45+5:30

तरुणाचे काही नातलग आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्याला खाली उतरण्याची विनंती करताहेत.

My wish is to bring home a wife and childrens; Sholay style agitation of young man on water tank | Video:'एकच इच्छा बायको,मुलांना घरी आणा'; तरुणाचे जलकुंभावर शोले स्टाईल आंदोलन

Video:'एकच इच्छा बायको,मुलांना घरी आणा'; तरुणाचे जलकुंभावर शोले स्टाईल आंदोलन

Next

नांदेड - बायको आणि मुलांना परत घरी घेऊन या,  नाहीतर जीव देतो, असे म्हणत एक एकजण येथील जलकुंभावर टाकीवर जाऊन बसला आहे. नांदेड शहरातील शोभा नगर भागातील हा प्रकार आहे. 

अंबानगर मध्ये राहणारा देविदास येरगे असे या युवकाचे नाव आहे, देविदास त्याची पत्नी आणि दोन मुलांसह हैद्राबादमध्ये कामास होता. काही दिवसांपूर्वी तो नांदेडला परतला. मात्र, पत्नी मुलांसह हैद्राबाद मध्येच आहे. पत्नी नांदेडला येत नसल्याने देविदास हताश झाला होता, त्यानंतर आज सकाळी तो पाण्याच्या टाकीवर चढलाय. 

स्वातंत्र्य सैनिक कॉलनीतील पाण्याच्या टाकीवर सकाळी 7 वाजेपासून चढला आहे. पत्नी आणि मुलांना आणण्याची मागणी तो करतोय. त्याचे काही नातलग आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्याला खाली उतरण्याची विनंती करताहेत. पण तो खाली उतरायला तयार नाही.

Web Title: My wish is to bring home a wife and childrens; Sholay style agitation of young man on water tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.