नाफेडची तूर खरेदी आजपासून सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:07 AM2021-02-05T06:07:58+5:302021-02-05T06:07:58+5:30
तूर या अंतर पिकाचे क्षेत्र सहा हजार १९० हेक्टर इतके होते. यावर्षी तुरीचा दाणा बारीक असून, नाफेडचे ...
तूर या अंतर पिकाचे क्षेत्र सहा हजार १९० हेक्टर इतके होते. यावर्षी तुरीचा दाणा बारीक असून, नाफेडचे भाव सहा हजार रुपये प्रतिक्विंटल आहेत, तर खासगी व्यापारी ५ हजार ८५० ते ५ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करीत आहेत. तुरीचे भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतकरी नाफेड खरेदीकडे पाठ फिरवतील आणि खासगी व्यापाऱ्यांनाच आपली उत्पादित तूर विकतील, असेच सध्या चित्र आहे. दीड हजार तूर उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती किनवटकडे ऑनलाईन नोंदणी केली. आज नाफेडच्या तूर खरेदीचा प्रारंभ होत असून, पंधरा तूर उत्पादक शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीने एसएमएस पाठविले आहेत. मात्र, किती तूर येईल हे आज समजेल .
एकतर खुल्या बाजारपेठेत ५ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल भाव व नाफेडचे ६ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव असा शंभर रुपयांचा फरक असताना नाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर विक्रीपोटी चाळणी, मायचर, हमाली, वाहतूक खर्च ही झळ सोसावी लागणार आहे. त्यातच एजंट म्हणून भूमिका बजावणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीने माल खरेदी करायचा, त्यानंतर जोपर्यंत व्हेअर हाऊसला डेपोट करू शकत नाही, तोपर्यंत चुकारा मिळणार नसल्याने तूर उत्पादक शेतकरी खासगी व्यापाऱ्यांनाच विकणे पसंद करतील, असेच सध्या चित्र आहे.