नायगाव तालुका निवडणुकीत ८ ग्रा .पं.मध्ये पुरूषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:14 AM2020-12-26T04:14:58+5:302020-12-26T04:14:58+5:30

नायगाव तालुक्यात ६८ ग्रामपंचायतच्या निवडणूका घेण्यात येत असून सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे काम चालू आहे. या ६८ ग्रामपंचायतची ...

In Naigaon taluka election, there are more women voters than men in 8 villages | नायगाव तालुका निवडणुकीत ८ ग्रा .पं.मध्ये पुरूषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक

नायगाव तालुका निवडणुकीत ८ ग्रा .पं.मध्ये पुरूषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक

Next

नायगाव तालुक्यात ६८ ग्रामपंचायतच्या निवडणूका घेण्यात येत असून सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे काम चालू आहे. या ६८ ग्रामपंचायतची एकूण मतदार संख्या ११०५६२ आहे. मतदारसंख्यानुसार मतदारांना मतदान करण्यासाठी २२५ केंद्राची व्यवस्था करण्यात आली. तालुक्यात सर्वात मोठी नरसी तर सर्वात लहान मेळगाव ग्रामपंचायत मतदारसंघ आहे.

या निवडणुकीत भोपाळा, धुप्पा, खैरगाव, कुंचोली, मुस्तापूर शेळगाव गौरी, टाकळी(बु), मनुर(त.ब) या ग्रामपंचायत मतदार संघात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. भोपाळा ग्रामपंचायत मतदारसंघात पुरुष ५०८ व महिला५७१ तर एकूण १०७९ मतदार आहेत. धुप्पा-पुरूष ६४८ व महिला ६९२ तर एकूण १३४०

खैरगाव पुरुष ६८२ महिला ६८५ एकूण १३६७ मतदार आहेत. कुंचोली पुरुष ९०१ व महिला १ हजार तर एकूण १९१० मतदार आहेत. मुस्तापूर पुरुष ३१० व महिला ३१९ एकूण ६२९ मतदार आहेत. शेळगाव गौरी पुरुष ६१६ महिला ६८७ एकूण एकूण १३०३ मतदार आहेत. टाकळी(बु)- पुरुष ६९६ महिला ८०० एकूण १४९५ मतदार आहेत. मनुर(त ब) पुरुष ५४१ महिला ५४७ एकूण १०८८ मतदार आहेत. या ८ ग्रामपंचायत मतदार संघात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या ३९१ ने अधिक आहे.

Web Title: In Naigaon taluka election, there are more women voters than men in 8 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.