नानासाहेब जाधव यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय -सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:53 AM2021-01-08T04:53:56+5:302021-01-08T04:53:56+5:30

नांदेड : श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नारायणराव ऊर्फ नानासाहेब जाधव यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अत्यंत ...

Nanasaheb Jadhav's work in the field of education is remarkable - Sawant | नानासाहेब जाधव यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय -सावंत

नानासाहेब जाधव यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय -सावंत

Next

नांदेड : श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नारायणराव ऊर्फ नानासाहेब जाधव यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन माजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री डी. पी. सावंत यांनी केले.

श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एन. आर. जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त १ जानेवारी रोजी जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयात वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सोहळा पार पाडला. यावेळी सावंत बोलत होते.

यावेळी महापौर मोहिनी येवनकर, आ. मोहन हंबर्डे, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, विजय येवनकर, नगरसेवक श्रीनिवास जाधव, राजू काळे, सिद्धार्थ गायकवाड, प्राचार्य डॉ. डब्ल्यू. आर. मुजावर, संजय इंगेवाड, शांतादेवी जाधव, सभापती रामराव नाईक, प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

दरम्यान, प्राचार्य डॉ. मुजावर व प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांनीही डॉ. नानासाहेब जाधव यांचा सपत्नीक यथोचित सत्कार केला. नगरसेवक श्रीनिवास जाधव यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी प्राचार्य डॉ. सुरेश घुले, प्राचार्या गोणारकर, प्रा. डॉ. अशोक वलेकर, प्रा. डॉ. पंडित चव्हाण, प्रा. रावसाहेब दोरवे, प्रा. सुनील राठोड, डॉ. व्ही. आर. राठोड, प्रा. डॉ. एस. बी. शिंदे, प्रा. शेख व प्रा. एन.व्ही. कांबळे यांच्यासह उपरोल्लेखित संस्थेअंतर्गत विविध माध्यमिक शाळा व महाविद्यालयांमधील मुख्याध्यापक, प्राध्यापक, सहशिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. पंचशील एकंबेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. साहेबराव शिंदे यांनी केले, तर प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांनी आभार मानले.

(वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: Nanasaheb Jadhav's work in the field of education is remarkable - Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.