नांदेडमध्ये आदिवासींचा अन्यायाविरूध्द आक्रोश मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 01:07 AM2017-12-01T01:07:30+5:302017-12-01T01:07:36+5:30
नांदेड : राज्यकर्ते व प्रशासकीय अधिकाºयांच्या संगनमताने अनुसूचित जमातीच्या काही जातीवर जाणिवपूर्वक अन्याय केल्याचा आरोप करीत आपल्या मागण्यासाठी मन्नेरवारलू, कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ठाकूर, ठाकूर माना, हलबा, तडवी, राजगोंड आदी अनुसूचित जमातीच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून आपल्या भावना व्यक्त केल्या़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : राज्यकर्ते व प्रशासकीय अधिकाºयांच्या संगनमताने अनुसूचित जमातीच्या काही जातीवर जाणिवपूर्वक अन्याय केल्याचा आरोप करीत आपल्या मागण्यासाठी मन्नेरवारलू, कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ठाकूर, ठाकूर माना, हलबा, तडवी, राजगोंड आदी अनुसूचित जमातीच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून आपल्या भावना व्यक्त केल्या़
अनुसूचित जमातीतील जातीना आरक्षणाचा हक्क असताना तो डावलण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भावना अनुसूचित जमातीमध्ये निर्माण होत आहे़ शासन निर्णयही त्याचपध्दतीने होत असल्याने एका आदिवासी जमातीला राज्यात वेगवेगळे नियम लावले जात असल्याने अन्यायग्रस्त मूळ आदिवासी समन्वय समितीच्यावतीने या मोर्चाचे आयोजन केले होते़
शहरातील नवा मोंढा मैदानावर गुरूवारी सकाळपासूनच जिल्हाभरातून वेगवेगळ्या वाहनाने लोक दाखल झाले़ बाहेरगावाहून आलेल्या मोर्चेकºयांसाठी शहरात ठिकठिकाणी अन्यदान व पाणी वाटप करण्यात आले़ दुपारी अडीच वाजता निघालेल्या या मोर्चात महिला, तरूणी तसेच युवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता़ महापुरूषांच्या नावांचा जयघोष करीत या मोर्चाने शहरवासियांचे लक्ष वेधले़
अनेक मोर्चेकरी हे पारंपारिक आदिवासी वेशभूषेतही दाखल झाले होते़ मोर्चामध्ये स्वयंसेवकांनीही महत्वाची भूमिका बजावताना मोर्चाला शिस्तीत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचवले़ जिल्हाधिकारी कार्यालयापुढे या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले़ माजी मंत्री दशरथ भांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शासनाची भूमिका हा दलित, आदिवासींच्या विरोधातच राहिल्याचे स्पष्ट केले़
समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेशराव अंबुलगेकर यांनीही शासनाकडूनच आदिवासींमध्ये दुजाभाव केला जात असल्याचे सांगितले़ लोकप्रतिनिधींकडून शासनावर दबाव आणून अनुसूचित जमातींसाठी जाचक अटी लादल्या जात आहेत़ शासनाच्या योजनांचा आदिवासींना लाभ मिळू नये हाच यामागचा उद्देश असल्याचे ते म्हणाले़
भाजपाचे आ़डॉ़ तुषार राठोड, शिवसेनेचे आ़ सुभाष साबणे यांनीही मोर्चाला हजेरी लावताना आदिवासी तसेच अनुसूचित जमातीतील विविध समाजघटकांच्या मागण्यांना आपला पाठींबा असल्याचे मंचावरून सांगितले़ आदिवासी विकास विभागाने १ जुलै २०१६ रोजी स्थापन केलेली विशेष चौकशी समिती ही मन्नेरवारलू समाजाविरूध्द तसेच सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारी असल्याचेही मोर्चेकºयांनी निवेदनात म्हटले़ या विशेष चौकशी समितीकडून होणारी तपासणी थांबवावी व बेकायदेशीर कृती करणाºया अधिकाºयांविरूध्द कडक कारवाई करण्याची मागणी एकमुखाने यावेळी करण्यात आली़
अनुसूचित जमातीतील मन्नेरवारलू, महादेव कोळी तसेच अन्य जातीचे जात वैधता प्रमाणपत्र गेल्या सहा ते सात वर्षापासून दिले जात नसल्याचे अनेकांचे शैक्षणिक नुकसान झाले़ जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी मराठवाड्यात केवळ औरंगाबाद येथे कार्यालया आहे़ या कार्यालयाची जिल्हानिहाय स्थापना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली़ मोर्चासाठी अन्यायग्रस्त मूळ आदिवासी समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेशराव अंबुलगेकर, कार्याध्यक्ष परमेश्वर गोणारे, माजी आ़ गंगाराम ठक्करवाड, सोपानराव मारकवाड, बाबुराव पुजरवाड, मधुकर उन्हाळे, गिरधर मोळके, माजी सभापती मंगाराणी अंबुलगेकर आदींनी परिश्रम घेतले़ ते यशस्वी झाल्याचे दिसून आले़ मोर्चामध्ये अमितकुमार कंठेवाड, अतुल पेद्देवाड, जनार्दन ठाकूर, शंकर बंतलवाड, संजय मोरे, प्रा़नितिन दारमोड, जी़ बी़ गिरोड, डॉ़अमोल कलेटवाड, सदाशिव पुपलवाड, आंबादास आकुलवार आदी सहभागी झाले होते़
स्वयंसेवकांनी घडवले स्वच्छतेचे दर्शन
गुरूवारी निघालेल्या मोर्चात स्वयंसेवकांनी मोर्चा शिस्तीत जाण्यासाठी प्रयत्न केलेच़ त्याचवेळी मोर्चा संपल्यानंतर स्वयंसेवकांनी मोर्चादरम्यान शहरात पडलेले पाणीपाऊच, प्लास्टिक डिश, पाणी बॉटल्स आदी कचरा उचलला़ मोर्चाच्या शेवटी कचरा एकत्रित करून तो ट्रॅक्टरने शहराबाहेर फेकण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती़ यामुळे मोर्चानंतरही रस्ते स्वच्छ दिसून आले़
शहरात मागील वर्षभरात विविध समाजाचे जवळपास ४ ते ५ मोर्चे निघाले़ या मोर्चात लाखो नागरिक सहभागी झाले होते़ या सर्वच मोर्चात स्वयंसेवकांनी शिस्तीचे तसेच स्वच्छतेचे दर्शन घडवले होते़ हीच परंपरा गुरूवारी निघालेल्या आदिवासी मोर्चात कायम होती़ परिणामी जिल्हाभरातून दाखल झालेल्या हजारो मोर्चेकºयानंतरही शहरात कचरा पडलेला दिसून आला नाही़