नांदेड कृषी उत्पन्न बाजारसमिती शेतक-यांना देणार सोयाबीन, हळद मालावर तारणकर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 06:01 PM2017-12-08T18:01:44+5:302017-12-08T18:03:58+5:30
शासनाच्यावतीने शेतक-यांना त्यांच्या मालावर योग्य प्रमाणात कर्ज मिळावे या उद्देशाने शेतमाल तारण कर्ज देण्यात येत आहे. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने सोयाबीन आणि हळद मालावर कर्ज उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती कृउबा समितीचे सभापती बी.आर. क़दम यांनी दिली.
नांदेड : शासनाच्यावतीने शेतक-यांना त्यांच्या मालावर योग्य प्रमाणात कर्ज मिळावे या उद्देशाने शेतमाल तारण कर्ज देण्यात येत आहे. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने सोयाबीन आणि हळद मालावर कर्ज उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती कृउबा समितीचे सभापती बी.आर. क़दम यांनी दिली़
बाजारपेठेत एकाच वेळी शेतमाल आल्यामुळे शेतक-यांना तो कमी दराने विक्री करावा लागतो़ त्यामुळे शेतक-यांचे नुकसान होते. अशावेळी सदरील शेतमालावर कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने शेतक-यांचे आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होते़ बाजारपेठेत सुरू असलेल्या किंमतीच्या ७५ टक्के रक्कम शेतमाल तारण कर्ज म्हणून दिली जाणार आहे़ दरम्यान, शेतीमालाचे भाव वाढले तर शेतकरी सदरील कर्ज परतफेड करून आपला माल चालू भावाने विक्री करू शकतो़
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांच्याकडून सदर कर्ज योजना राबविण्यात येत आहे़ शेतमालासोबत चालु वर्षाचा सातबारा उतारा लागेल, त्याचबरोबर तारणकर्जाची मुदत ६ महिने असून त्यावर ६ टक्के व्याज आकारले जात आहे़ शेतकºयांनी उत्पादीत केलेला माल एकदाच बाजारात येवून त्याच्या किंमती पडतात. अशावेळी शेतमाल तारण कर्ज शेतक-यांना पर्याय असते़ या योजनेचा शेतक-यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृउबा समितीचे सभापती बी़ आऱ कदम, सचिव हरिश्चंद्र देशमुख यांनी केले.