Nanded: राज्य सरकारच व्हेंटिलेटरवर, अंबादास दानवे यांची बोचरी टीका
By शिवराज बिचेवार | Published: October 4, 2023 10:07 AM2023-10-04T10:07:44+5:302023-10-04T10:13:36+5:30
Nanded News: छत्रपती संभाजी नगर, नांदेड, नागपूर यासह राज्यातील शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरू आहे. परंतु खोक्याचे हे सरकार जागचे हलायला तयार नाही, हे सरकारच व्हेंटिलेटरवर आहे असा आरोप विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला.
- शिवराज बीचेवार
नांदेड- छत्रपती संभाजी नगर, नांदेड, नागपूर यासह राज्यातील शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरू आहे. परंतु खोक्याचे हे सरकार जागचे हलायला तयार नाही, हे सरकारच व्हेंटिलेटरवर आहे असा आरोप विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला.
दानवे हे बुधवारी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी अधिष्ठाता डॉ एस आर वाकोडे यांच्याकडून औषध साठा, रिक्त डॉक्टर अन कर्मचारी संख्या याची माहिती घेतली. तसेच रुग्णालयात बाल रोग विभाग तसेच वॉर्ड मध्ये जाऊन पाहणी केली. यावेळी दानवे म्हणाले, हे सरकार खोटे बोलत आहे, रुग्णालयात औषधी नसताना मुबलक साठा असल्याचे छातीठोकपणे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात गोरगरीब रुग्णांना बाहेरून औषधी आणावी लागत आहे. पदे रिक्त आहे, मंत्री आले पाहणी करून गेले त्यानंतर ही मृत्यूची मालिका सुरूच आहे. या सर्व मृत्यूला हे सरकार जबाबदार आहे. आता तरी सरकारचे डोळे उघडावे असेही दानवे म्हणाले.