नांदेड-मुंबई विमान पुन्हा झेपावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 01:15 AM2017-11-17T01:15:31+5:302017-11-17T01:16:26+5:30
नांदेड : केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेंतर्गत घोषित करण्यात आलेल्या नांदेड-मुंबई आणि नांदेड- हैदराबाद टू-जेट विमानसेवेला गुरुवारपासून प्रारंभ झाला. तब्बल चार वर्षांनंतर नांदेड-मुंबई विमानसेवा पूर्ववत झाली आहे. या विमानसेवेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी ५५ प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला.
आता पुढचे पाऊल म्हणून नांदेड शहराला देशातील इतर महत्वाच्या शहराशी जोडण्यासाठी एअर इंडियाची नांदेड-दिल्ली-अमृृतसर अशी विमानसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु असून ही विमानसेवाही लवकरच सुरु होईल, असा विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. एअर इंडिया कंपनीने नांदेड अमृतसर ही विमानसेवा सुरु करण्यासाठीची चाचपणी घेतली आहे. नांदेड अमृतसर हे विमान व्हाया दिल्ली मार्गे सुरु केले तर प्रवाशांची अधिक उपलब्धी होऊ शकते. तसेच देशाची राजधानी दिल्लीला विमानसेवेने जोडता येईल त्या दृष्टीने केंद्र शासनाच्या नागरी उड्डान मंत्रालय व एअर इंडियाच्या प्रशासनाशी चर्चा झाली असल्याचे सांगत एअर इंडिया कंपनीमार्फत याबाबतची चाचपणी करण्यात येत असल्याची माहितीही चव्हाण यांनी दिली.
नांदेड-दिल्ली-अमृतसर या विमानसेवेसोबतच मुंबई-कोल्हापूर, मुंबई-सोलापूर, व मुुंबई -अमरावती अशी विमानसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या संदर्भात येणाºया काळात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता असून नांदेड-दिल्ली-अमृतसर अशी विमानसेवा एअर इंडियाकडून लवकरच सुरु होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एअर इंडिया कंपनीच्या बोईंग विमानाची आसनक्षमता जास्तीची आहे. ११७ किंवा १७० आसन व्यवस्था असलेले विमान या मार्गावर चालविल्या जाणार आहे. त्यामुळे हे विमान उतरण्यास आवश्यक असलेली धावपट्टी व इतर सुविधांचा आढावा कंपनीकडून लवकरच घेण्यात येणार असल्याचे समजते.
अमृतसरमार्गे कनेक्टीव्हीटीसाठी प्रयत्न
नांदेड -मुंबई विमानसेवा सुरु झाली. ही बाब गुरुद्वारा येथे दर्शनाला येणाºया भाविकांसाठी दिलासा देणारी असल्याचे सचखंड गुरुद्वारा कमिटीचे अध्यक्ष आ. सरदार तारासिंघ यांनी म्हटले आहे. येणाºया काळात नांदेड-मुंबई विमानसेवेला अमृतसर-मुंबई आणि अमृतसर-हैदराबाद अशी कनेक्टीव्हीटी मिळावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. असे झाल्यास अमृतसरहून मुंबई मार्गे नांदेड आणि अमृतसरहून हैदराबाद मार्गे नांदेड असा प्रवासही करता येईल. ३० लाख शीख बांधव विविध देशांत राहतात. त्यांच्यासाठी ही विमानसेवा मोलाची ठरणार असल्याचेही तारासिंह यांनी सांगितले.
नांदेडहून सकाळी १०.३५ ला सुटणार विमान
मुंबईहून दुपारी १२़४५ वाजता सुटणारे विमान दुपारी २ वाजून २० मिनिटांनी नांदेडमध्ये पोहोचेल़ नांदेडहून सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी सुटणारे विमान मुंबईत दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल़
रनवेच्या दुरुस्तीसाठी बंद असलेली नांदेड-हैदराबाद विमानसेवाही १६ नोव्हेंबरपासूनच सुरू झाली.
हैदराबाद येथून सकाळी ९ वाजता निघणारे विमान सकाळी १० वाजता नांदेडात तर नांदेडहून दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी सुटणारे विमान दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी हैदराबाद येथे पोहोचणार आहे.