नांदेडात जैविक कचरा रस्त्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 01:04 AM2018-10-12T01:04:11+5:302018-10-12T01:04:32+5:30

शहरातील बहुतांश रुग्णालयात निघणारा जैविक कचरा हा महापालिकेच्या घंटागाड्यात किंवा रस्त्यावरच टाकला जात असल्याची बाब पुढे आली आहे. महापालिकेने सलग दुस-या दिवशी खाजगी रुग्णालयावर कारवाई केली आहे. शहरातील डॉक्टरलेन भागातील लोटस रुग्णालयाला महापालिकेच्या पथकाने १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Nanded biological waste on the road | नांदेडात जैविक कचरा रस्त्यावरच

नांदेडात जैविक कचरा रस्त्यावरच

googlenewsNext
ठळक मुद्देसलग दुसऱ्या दिवशी रूग्णालयाला दंड

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरातील बहुतांश रुग्णालयात निघणारा जैविक कचरा हा महापालिकेच्या घंटागाड्यात किंवा रस्त्यावरच टाकला जात असल्याची बाब पुढे आली आहे. महापालिकेने सलग दुस-या दिवशी खाजगी रुग्णालयावर कारवाई केली आहे. शहरातील डॉक्टरलेन भागातील लोटस रुग्णालयाला महापालिकेच्या पथकाने १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
महापालिकेने जैविक कचºयाच्या प्रश्नावर रुग्णालयावर कारवाईचा बडगा उगारला आहे. बुधवारी गोवर्धन घाट भागातील बोरबन फॅक्ट्री या भागातील अंकुर मॅक्स रुग्णालयाला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. गुरुवारी ही कारवाई सुरु ठेवली. डॉक्टरलेन भागातील लोटस हॉस्पिटल मधून दैनंदिन निर्माण होणारा जैविक कचरा अर्थात बायोमेडीकल वेस्ट महापालिकेच्या घंटागाडीत टाकल्याचा प्रकार उघडकीस आला. या रुग्णालयाने बायोमेडीकल वेस्ट हँडलिंग रुल्स १९९८ चे उल्लंघन केल्यामुळे लोटस हॉस्पिटलला १५ हजार रुपयांचा दंड महापालिकेने ठोठावला.
शहरात जैविक कचरा महापालिकेच्या घंटागाड्यात टाकणाºयाविरुद्ध कारवाई सुरु असतानाही बिनदिक्कतपणे खाजगी रुग्णालय बायोमेडीकल वेस्टेज रस्त्यावर फेकत आहे. या गंभीर बाबीकडे महापालिकेने लक्ष देत कारवाई सुरु केली आहे. या कारवाईत सातत्य राखणे आता आवश्यक आहे. ज्यातून खाजगी रुग्णालय बायोमेडीकल वेस्ट हँडलिंग रुल्सचे पालन करतील.
महापालिकेच्या पथकाने गुरुवारी प्लास्टिक बंदी मोहीम राबविली. कलामंदिर मुख्य रस्ता, आयुर्वेदिक रुग्णालय परिसर, गणेश टॉकीज रोड आदी भागात मनपा पथकाने पाहणी केली असता दोन व्यावसायिकांकडे प्लास्टिक आढळले. महापालिकेने भगत बॅग हाऊस आणि कृष्णा अवेन्यू या दुकानदारांना प्रत्येकी ५ हजार रुपये दंड ठोठावला.
खाजगी रुग्णालयांवरील कारवाई आणि प्लास्टिक बंदी मोहिमेत महापालिकेचे सहायक आयुक्त गुलाम सादेक, स्वच्छता निरीक्षक राजेंद्र गंदमवार, गोविंद थेटे, अतिक अन्सारी, वसीम तडवी आदी सहभागी होते.
दरम्यान, महापालिकेने सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना दैनंदिन निघणारा बायोमेडीकल वेस्ट कचरा महापालिकेने नियुक्त केलेल्या मे. सुपर्ब हायजैनिक डिस्पोजल प्रा. लि. या संस्थेकडे द्यावा. घंटागाडीत जैविक कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा दिला.

Web Title: Nanded biological waste on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.