नांदेडची शहर बससेवा झाली तोळामोळा; अवघ्या नऊ गाड्यांवर मदार 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 12:03 PM2017-12-22T12:03:22+5:302017-12-22T12:06:04+5:30

जवळपास सहा लाख लोकसंख्या असणार्‍या नांदेड शहर व परिसरातील नगरांना आजघडीला ८ ते १० बसच्या माध्यमातून सेवा दिली जात आहे़ एसटीतील अधिकार्‍यांच्या उदासिनतेमुळे दिवसेंदिवस शहर बस तोट्यात धावत आहे.

Nanded city bus service turns violent | नांदेडची शहर बससेवा झाली तोळामोळा; अवघ्या नऊ गाड्यांवर मदार 

नांदेडची शहर बससेवा झाली तोळामोळा; अवघ्या नऊ गाड्यांवर मदार 

googlenewsNext
ठळक मुद्देएसटीतील अधिकार्‍यांच्या उदासिनतेमुळे दिवसेंदिवस शहर बस तोट्यात धावत आहे. संचित तोटा पोहोचला १९ कोटीच्या घरात नांदेड शहर व परिसरातील नगरांना आजघडीला ८ ते १० बसच्या माध्यमातून सेवा दिली जात आहे़

नांदेड : जवळपास सहा लाख लोकसंख्या असणार्‍या नांदेड शहर व परिसरातील नगरांना आजघडीला ८ ते १० बसच्या माध्यमातून सेवा दिली जात आहे़ एसटीतील अधिकार्‍यांच्या उदासिनतेमुळे दिवसेंदिवस शहर बस तोट्यात धावत आहे. महापालिकेने हस्तांतरित केल्यापासून आजपर्यंत १९ कोटी ३५ लाख ९५ हजारांचा संचित तोटा राज्य परिवहन महामंडळाच्या माथी पडला आहे.

महापालिकेने २०१० मध्ये शहर बस चालविण्याची जबाबदारी एसटी महामंडळाकडे दिली होती़ यानंतर जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान अभियानाअंतर्गत मिळालेल्या ३० बस महामंडळाला देण्यात आल्या़ यामध्ये दहा मोठ्या आणि २० मिनी बसचा समावेश होता़ परंतु, टाटा कंपनीच्या असलेल्या या बससेवेच्या देखभाल-दुरुस्तीचा मेळ एसटीच्या कर्मचार्‍यांना लागलाच नाही़ दुरूस्तीचा खर्च आवाक्याबाहेर गेल्यामुळे पहिल्या वर्षातच या सेवेचे तीन तेरा वाजणार असल्याचे स्पष्ट झाले होते़ यानंतरही रडत-पडत एसटीतील अधिकार्‍यांनी सदर सेवा रेटून नेण्याचा प्रयत्न केला़ आजघडीला केवळ औपचारिकता म्हणून शहर बससेवा दिली जात आहे़ ३० पैकी ८ ते १० बसेस रस्त्यावर असतात़ गुरूवारी केवळ ९ बस  शहरात धावत असताना आढळून आल्या़ शहराला बोटावर मोजण्याऐवढ्या बस सेवा देत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे़

जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत नांदेडात शहर बस सेवेसाठी लालपरी मिळाली होती़ ही सेवा चालविण्याची जबाबदारी मनपाने कंत्राटदाराकडे दिली होती़ कंत्राटदाराच्या चुकीच्या नियोजनामुळे शहरबससेवा बंद पडली़ त्यानंतर हे काम अकोल्याच्या एका खासगी कंपनीला दिले़ 

अकोल्याच्या कंपनीला तर लालपरी भंगारात काढण्याची वेळ आली़ यानंतर शहरबसेवेचा प्रश्न गंभीर झाला होता़ त्यानंतर मिळालेल्या ३० बस महापालिकेने एसटी महामंडळाला चालविण्यासाठी दिल्या़ परंतु अगोदरच कर्मचार्‍यांची अपुरी संख्या असलेल्या महामंडळाने उसने अवसान आणून ही जबाबदारी स्वीकारली़ परंतु पहिल्या काही महिन्यातच या बसेसच्या दुरुस्तीसाठी लागणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नसल्यामुळे एक-एक बस दुरुस्तीच्या नावाखाली वर्कशॉपला जमा होण्यास सुरुवात झाली़ सदर बससेवा तोट्यात जात असल्याचे निदर्शनास आल्याने बससेवा पुन्हा महापालिकेने चालवावी, असा पत्रव्यवहार एसटीने महापालिकेशी करण्यास सुरूवात केली़ परंतु, आजपर्यंत महापालिका प्रशासनाने कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही़ 

नियोजनाचा अभाव 
शहरातून गजानन महाराज मंदिर ते रेल्वेस्थानक, रेल्वेस्थानक ते विद्यापीठ, विद्यापीठ ते सांगवी, विष्णुपुरी, भनगी ते रेल्वेस्थानक आदी मार्गावर गर्दी असते़ परंतु, या मार्गावर केवळ एक बस असल्याने प्रवाशांना  नाईलाजाने आॅटोने  प्रवास करावा लागतो़ रेल्वेस्टेशन ते सिडको, हडको, विद्यापीठ या मार्गावर विद्यार्थी संख्या अधिक असते़ परंतु या मार्गावरही एखादी बस सोडली जाते़ मध्यंतरी मनपाने नव्याने शहर बससेवेच्या हालचाली सुरु केल्या होत्या़ त्यात महापालिका निवडणूक आल्याने त्या चर्चेला विराम मिळाला होता़   

Web Title: Nanded city bus service turns violent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.