नांदेड शहरात पेट्रोलची शतकाकडे घोडदौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 12:15 AM2018-09-10T00:15:09+5:302018-09-10T00:15:56+5:30

गेल्या महिनाभरात पेट्रोलचे दर तब्बल ५ रुपये १६ पैशांनी वाढले आहेत़ त्यामुळे सर्वसामान्यांचे महागाईने कंबरडे मोडले आहे़

In the Nanded city, the petrol of hundreds has a lot of enthusiasm | नांदेड शहरात पेट्रोलची शतकाकडे घोडदौड

नांदेड शहरात पेट्रोलची शतकाकडे घोडदौड

googlenewsNext
ठळक मुद्देमहिनाभरात पेट्रोल ५ रुपये १६ पैशांनी वाढले

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : देशभरात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे़ सर्वात जास्त पेट्रोल आणि डिझेलचे दर असलेल्या जिल्ह्यांमध्ये नांदेडचाही समावेश आहे़ पेट्रोलच्या दराची शंभरीकडे जोरदार घोडदौड सुरु असून शुक्रवारी नांदेडात पेट्रोल ८८ रुपये ९७ पैशांवर गेले होते़ शनिवारी त्यात ३८ पैशांची तर रविवारी पुन्हा ८ पैशांची वाढ झाली होती़ गेल्या महिनाभरात पेट्रोलचे दर तब्बल ५ रुपये १६ पैशांनी वाढले आहेत़ त्यामुळे सर्वसामान्यांचे महागाईने कंबरडे मोडले आहे़
आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाची किंमत, रुपयाची किंमत, वाहतूक आणि माल चढ-उतारासाठी येणारा खर्च, तेल शुद्ध करण्यासाठी येणारा खर्च या सर्व बाबीसह केंद्राचा आणि त्या-त्या राज्याचा कर यावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अवलंबून असतात़ एक लिटर पेट्रोल भरल्यानंतर सर्वसामान्य माणूस केंद्राला तब्बल १९ रुपये ४८ पैसे एवढा कर देतो़ तर राज्याचा कर त्यापेक्षा अधिक म्हणजेच ३८ रुपये ४२ पैसे एवढा आहे़ त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याबाबत सरकार फारसे गंभीर नसल्याचेच दिसत आहे़ राज्यात परभणीनंतर नांदेडातच पेट्रोल आणि डिझेलचे सर्वाधिक दर आहेत, हे विशेष!
नांदेडात तर गेल्या महिनाभरात पेट्रोल आणि डिझेलचा दर वेगाने वाढत आहेत़ १ आॅगस्टला नांदेडात पेट्रोल ८५़२८ पैसे तर डिझेल ७२़३९ पैसे लिटर होते़ त्यामध्ये दररोज काही पैशांनी वाढच होत गेली़ पाचच दिवसांत ६ आॅगस्टला पेट्रोल ८६ रुपये १ पैसा तर डिझेल ७३ रुपये १२ पैसे प्रतिलिटर झाले होते़ १५ आॅगस्टला पेट्रोल ८६़१८ तर डिझेल ७३़४१ पैशावर गेले होते़
आॅगस्टअखेर २७ तारखेला पेट्रोल ८६़९२ तर डिझेल ७४़१२ रुपयांवर गेले होते़ ३० आॅगस्टला पेट्रोल-८७़३१, डिझेल- ७४़६६, १ सप्टेंबरला पेट्रोल-८७़६८, डिझेल- ७५़१७, ३ सप्टेंबरला पेट्रोल- ८८़१४, डिझेल- ७५़९३, ४ सप्टेंबर पेट्रोल- ८८़३०, डिझेल- ७६़१२, ५ सप्टेंबर पेट्रोल- ८८़३०, डिझेल-७६़१२ तर ७ सप्टेंबरला नांदेडात पेट्रोलचे दर ८८़९७ तर डिझेल ७६़८८ रुपयांवर गेले होते़ त्यानंतर शनिवारी पेट्रोलच्या दरात पुन्हा ३८ पैशांनी तर ४७ पैशांनी वाढ झाली होती़ रविवारी नांदेडात पेट्रोलचे दर ८९़४७ तर डिझेल ७७़४४ रुपयांवर पोहोचले होते़
पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगाने वाढत असून सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे वैतागून हेच का ‘अच्छे दिन’ म्हणत नागरिक आपला रोष व्यक्त करत आहेत. दर कमी न झाल्यास त्याचा फटका म्हणून इतर वस्तूंचे दर वाढतील, अशी चर्चा सुरु आहे.

काँग्रेसच्या वतीने आज भारत बंदचे आयोजन
्रवाढत्या महागाईच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी देशव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे़ देशात आतापर्यंतच्या काळातील सर्वात ‘बुरे दिन’ आले असल्याची टीका काँग्रेसने केली आहे़ बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यापारी प्रतिष्ठाणे, शाळा, महाविद्यालये तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहने बंद ठेवून शासनाचा निषेध करावा़ बंदच्या काळात काँग्रेस कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा़ शांतता ठेवून नागरिकांना बंदमध्ये सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन आ़ डी़ पी़ सावंत यांनी केले आहे़

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मैदानात
पेट्रोल आणि डिझेलमध्ये झालेली भरमसाठ दरवाढ, महागाई आणि सरकारचे बेजबाबदार वर्तन या सर्व बाबींच्या विरोधात आज बहुपक्षीय भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही उतरणार आहे. जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष मोन्टीसिंघ जहागीरदार यांच्या नेतृत्त्वाखाली भारत बंद आंदोलनात मनसेचे कार्यकर्ते उतरणार आहेत.जिल्हाध्यक्ष रवी राठोड, महिला जिल्हाध्यक्षा सुरेखा पाटील, शहराध्यक्ष अब्दुल शफिक, मनविसेचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील बरडे, केदार नांदेडकर, प्रवीण मंगनाळे हे सहभागी होणार आहेत़

भाजीपाल्याचे दरही भिडले गगनाला !
्रपेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे भाजीपाल्याचे भावही वाढले आहेत़ शुक्रवारच्या बाजारात वांगी ६० रुपये किलो,मिरची-४० रुपये, कोबी-४० रुपये, आलू-४० रुपये, लसण-४० रुपये, टमाटे-१० रुपये, कांदे-२० रुपये तर कोंथीबिर तब्बल १५० रुपये किलोने विक्री करण्यात येत होती़ गेल्या काही दिवसांत भाजीपाल्याच्या दरातही सातत्याने वाढ होत असल्याचे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे़

नागरिकांत संताप
इंधन दरवाढीमुळे नागरिकांत मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. इंधनाचे दर भरमसाठ वाढल्याने कुटुंबाचे आर्थिक गणित कोलमडल्याचे सांगत दरवाढीवर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी तातडीने पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

Web Title: In the Nanded city, the petrol of hundreds has a lot of enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.