नांदेडच्या आयुक्तालयाची नांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:11 AM2018-01-19T00:11:51+5:302018-01-19T00:14:09+5:30

स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देणारी ७३ व ७४ व्या घटनादुरूस्तीचा रौप्यमहोत्सव राज्यात उत्साहात होत असताना याच विषयावर नांदेडमध्ये झालेली विभागीय परिषद ही नांदेडच्या प्रशासनाचा आत्मविश्वास वाढविणारी ठरली आहे़ दुसरीकडे या परिषदेमुळे नांदेडकरांनाही विभागीय दर्जाचा फील अनुभवता आला. एकप्रकारे ही परिषद नांदेडच्या विभागीय आयुक्तालयाची नांदी असल्याचे म्हटले जात आहे.

Nanded commisionar office | नांदेडच्या आयुक्तालयाची नांदी

नांदेडच्या आयुक्तालयाची नांदी

Next
ठळक मुद्देघटनादुरुस्ती रौप्य महोत्सवनांदेडकरांना मिळाला विभागीय दर्जाचा फील

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देणारी ७३ व ७४ व्या घटनादुरूस्तीचा रौप्यमहोत्सव राज्यात उत्साहात होत असताना याच विषयावर नांदेडमध्ये झालेली विभागीय परिषद ही नांदेडच्या प्रशासनाचा आत्मविश्वास वाढविणारी ठरली आहे़ दुसरीकडे या परिषदेमुळे नांदेडकरांनाही विभागीय दर्जाचा फील अनुभवता आला. एकप्रकारे ही परिषद नांदेडच्या विभागीय आयुक्तालयाची नांदी असल्याचे म्हटले जात आहे.
नांदेड, परभणी,लातूर आणि हिंगोली या चार जिल्ह्यांसाठीची लोकशाही, निवडणूक व सुशासन या विषयावरील परिषद नांदेडमध्ये पार पडली. या परिषदेला चार जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बरोबरच विभागीयस्तरावरील वरिष्ठ अधिका-यांचीही अवर्जुन उपस्थिती होती. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन या निमित्ताने गजबजले होते. विशेष म्हणजे एखाद्या मंत्रिमंडळ बैठकीप्रमाणे या परिषदेचे नियोजन होते. अतिशय सुसज्ज असे हे नियोजन भवन पाहून बाहेर जिल्ह्यांतून आलेल्या प्रतिनिधींनीही याचे कौतुक केले. सर्वसामान्य माणसाला विकासकाम व नियोजनात सहभाग देणारा कायदा ७३ व ७४ व्या घटनादुरूस्तीमुळे प्राप्त झाला़ अस्तित्वात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटीकरण करून प्रत्यक्ष विकासात सहभागी होण्याची संधी या घटनादुरूस्तीमुळे मिळाली. या बाबत दिवसभर मान्यवरांची व्याख्याने झाली. उपस्थितांनीही या चर्चेत सहभाग नोंदवून आपली मते मांडली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणास २५ वर्ष पूर्ण होत असताना राज्य निवडणूक विभागाच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यातकेवळ विभागीयस्तरावर परिषदांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र याला नांदेड अपवाद ठरले. सध्या विभागीय दर्जा नसतानाही नांदेडला या विभागीय परिषदेच्या आयोजनाचा मान मिळाला. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने काटेकोर नियोजन करुन ही परिषदही सर्वार्थाने यशस्वी ठरविली. ही जबाबदारी पेलताना प्रशासकीय पातळीवर कुठेही कमतरता राहणार नाही याची काळजी घेतली़
जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी नांदेड महापालिका, जिल्हा परिषद आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापाठाला समवेत घेवून या विभागीय पातळीवरील परिषदेला यशस्वी केले आहे़

आयुक्तालयाचा दावा झाला आणखी मजबूत
नांदेडच्या विभागीय आयुक्तालयाचा प्रश्न हा प्रशासकीय पातळीवर प्रलंबित ठेवला असला तरी ७३ व ७४ व्या घटनादुरूस्तीच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या विभागीय परिषदेच्या निमित्ताने नांदेडने आयुक्तालयाचा आपला दावा आणखीणच मजबूत केला आहे़ सर्वांगिणदृष्ट्या योग्य असलेल्या नांदेडचे आयुक्तालय कार्यान्वयीत करण्याचा प्रश्न राजकीय वादात अधांतरी राहिला असला तरी प्रत्यक्षात नांदेड जिल्ह्याने विभागाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे़ आता जिल्ह्यातील सर्वपक्षीय राजकीय मंडळींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

Web Title: Nanded commisionar office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.