नांदेड - देगलूर बसला धनेगाव बायपासजवळ अपघात; दोघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 11:55 AM2018-06-16T11:55:49+5:302018-06-16T11:55:49+5:30
नांदेडहून देगलूरला जाणारी बस ट्रकच्या धडकेने उलटली. यामध्ये चालक, वाहक यांच्यासह जवळपास 15 प्रवासी जखमी झाले.
नांदेड : नांदेडहून देगलूरला जाणारी बस ट्रकच्या धडकेने उलटली. यामध्ये चालक, वाहक यांच्यासह जवळपास 15 प्रवासी जखमी झाले. ही घटना आज सकाळी धनेगाव चौकात घडली.
शनिवारी सकाळी देगलूर आगाराची बस क्रमांक एमएच 14 बीटी 1567 नांदेड येथून देगलूरकडे निघाली. दरम्यान धनेगाव बायपास मार्गे नांदेड शहरात येणाऱ्या ट्रकने (एमएच-42 बी-9775 ) धनेगाव चौकात बसच्या डाव्या बाजूने जोराची धडक दिली. यात बस उलटली आणि जवळपास 15 प्रवासी आणि चालक, वाहक जखमी झाले आहेत.जखमींवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील दोघेजण गंभीर जखमी आहेत. बसमधील इतर प्रवासी सुखरूप आहेत.
अपघात झाल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व प्रवाशांना बसबाहेर काढुन रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी अविनाश कचरे, आगार व्यवस्थापक व्यवहारे, कांबळे आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.