नांदेडमध्ये पंतप्रधान घरकुलासाठी लाच घेतांना सहाय्यक अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:46 AM2017-12-15T00:46:35+5:302017-12-15T00:46:47+5:30
नांदेड : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांच्या यादीत नाव समाविष्ठ करण्यासाठी २ हजार ५०० रूपयांची लाच घेणाºया उमरी पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यकास गुरूवारी रंगेहात पकडले़ ही कारवाई गुरूवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांच्या यादीत नाव समाविष्ठ करण्यासाठी २ हजार ५०० रूपयांची लाच घेणाºया उमरी पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यकास गुरूवारी रंगेहात पकडले़ ही कारवाई गुरूवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली़
बोळसा ता़उमरी गावातील एका नागरिकाचे नाव प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या लाभार्थी यादीत समाविष्ठ करण्यासाठी तक्रारदाराकडे कनिष्ठ सहाय्यकाने दोन हजार पाचशे रूपये लाचेची मागणी केली होती़ दरम्यान, संबंधीताने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली़ यानंतर एसीबीच्या पथकाने उमरी पंचायत समिती कार्यालयातील बांधक विभाग परिसरात सापळा रचून लोकसेवक कनिष्ठ सहाय्यक बालाजी जाधव यांना तक्रारदाराकडून अडीच हजार रूपये लाच स्विकारल्यानंतर अटक करण्यात आली़ यावेळी त्यांनी स्विकारलेली अडीच हजार रूपये लाचेची रक्कम जप्त करण्यात आली़ याप्रकरणी उमरी ठाण्यात आरोपी लोकसेवक बालाजी जाधव (वय ४१) रा़अब्दुलापुर वाडी यांच्या विरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानूसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक संजय लाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक संजय कुलकर्णी, पोलीस निरीक्षक दयानंद सरवदे, पोनि कपिळ शेळके, व्यंकट शिंदे, शेख चाँद, हनमंत बोरकर, विलास राठोड, शेख मुजीब यांनी पार पाडली़ या प्रकरणचा तपास पोलीस निरीक्षक दयानंद सरवदे हे करीत आहेत्र