नांदेड जिल्ह्यात १५. ५७ मि़मी़ पाऊस; पेरण्या सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 03:02 PM2019-07-13T15:02:13+5:302019-07-13T15:04:09+5:30
पुनर्वसू नक्षत्रात गुरुवारी दिवसभरानंतर रात्री उशिरापर्यंत जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली़
नांदेड : मृग, आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्यामुळे नांदेडमधील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते़ त्यात पुनर्वसू नक्षत्रात गुरुवारी दिवसभरानंतर रात्री उशिरापर्यंत जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली़ जिल्ह्यात एकूण १५़५७ मि़मी़ पावसाची नोंद करण्यात आली आहे़
राज्यभर जोरदार पाऊस सुरू असताना नांदेड जिल्ह्यात मात्र जून महिन्यात एकच दिवस चांगला पाऊस झाला होता़ त्यानंतर पाऊस थांबल्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या़ गुरुवारी नांदेडात रिमझीम पावसास सुरुवात झाली होती़ नांदेड २७़९५ मि़मी़, मुदखेड १०़६७, अर्धापूर ११़३३, भोकर २़२५, उमरी ९़३३, कंधार ८़५०, लोहा ३़२०, किनवट १२़२९, माहूर ७़२५, हदगाव २, देगलूर ३४़६७, बिलोली ३८़४०, धर्माबाद १२़३३, नायगाव १९़६०, तर मुखेड मध्ये ४९़२९ मि़मी़ पावसाची नोंद झाली.
परभणी जिल्ह्यात १२.७७ मि.मी. पाऊस
च्परभणी जिल्ह्यामध्ये शुक्रवारपर्यंत १२.७७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. झालेल्या पावसात परभणी -१४.५० मि.मी., पालम- २ मि.मी., पूर्णा - २१.८० मि.मी., गंगाखेड- २.७५ मि.मी., सोनपेठ- २० मि.मी., सेलू- ९.२०, पाथरी- १२.६७, जिंतूर- २०.३३ तर मानवतमध्ये ११.६७ मि.मी. नोंद झाली.