नांदेड जिल्ह्यात दहावीतही पुन्हा मुलीच ठरल्या सरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 01:00 AM2018-06-09T01:00:18+5:302018-06-09T01:00:18+5:30
जिल्ह्याचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल ८३.०३ टक्के लागला असून सर्वाधिक निकाल मुखेड तालुक्याचा ९३.८३ टक्के तर सर्वात कमी मुदखेड तालुक्याचा ६९.६७ टक्के इतका लागला आहे. यावर्षीच्या निकालातही मुलीच पुढे आहेत. उत्तीर्णांमध्ये मुलांचे प्रमाण ८०.०७ टक्के तर मुलींचे प्रमाण ८४.०१ टक्के इतके आहे. मागील वर्षीच्या निकालाची तुलना करता यंदाही जवळपास तेवढाच निकाल लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्याचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल ८३.०३ टक्के लागला असून सर्वाधिक निकाल मुखेड तालुक्याचा ९३.८३ टक्के तर सर्वात कमी मुदखेड तालुक्याचा ६९.६७ टक्के इतका लागला आहे. यावर्षीच्या निकालातही मुलीच पुढे आहेत. उत्तीर्णांमध्ये मुलांचे प्रमाण ८०.०७ टक्के तर मुलींचे प्रमाण ८४.०१ टक्के इतके आहे. मागील वर्षीच्या निकालाची तुलना करता यंदाही जवळपास तेवढाच निकाल लागला आहे.
तालुकानिहाय निकाल पाहता मुखेड तालुक्याचा सर्वाधिक ९२.२ टक्के इतका निकाल लागला आहे. नांदेड ८२.६३, अर्धापूर ७८.२५, भोकर ७६.९६, बिलोली ८८.२७, देगलूर ८५.९२, धर्माबाद ७७.९२, हदगाव ७३.४७, हिमायतनगर ७४.०१, कंधार ९१.२३, किनवट ८२.१२, लोहा ८३.२६, माहूर ८१.२८, नायगाव ८७.७३, उमरी ७७.०३ तर मुदखेड तालुक्याचा निकाल सर्वात कमी म्हणजे ६९.६७ टक्के लागला आहे.परीक्षेसाठी नांदेड जिल्ह्यातील ६६० शाळांतील ४६ हजार १६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील २४ हजार ४२९ मुले आणि २१ हजार ३२२ मुली अशा ४५ हजार ७५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ३७ हजार ९८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.उत्तीर्ण झालेल्यांमध्ये १९ हजार ५६० मुले तर १८ हजार ४२६ विद्यार्थिनींचा समावेश आहे. उत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ९ हजार ४१७ विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत तर १३ हजार ९६ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत यश मिळविले आहे. दुसऱ्या श्रेणीत उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांची संख्या ११ हजार ९९६ इतकी आहे.
मार्चमध्ये झालेल्या या परीक्षेसाठी नांदेड जिल्ह्यातील ३ हजार ३२८ पुनर्परीक्षार्थिंंनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ३ हजार २८९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १ हजार ३५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुनर्परीक्षार्थिंच्या यशाचे प्रमाण ४१.२९ टक्के एवढे आहे. यात ३ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह यश मिळविले असून २८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ६४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. पुनर्परीक्षेचा तालुकानिहाय निकाल पाहता नांदेड ३१.७८, अर्धापूर ३९.८३, भोकर २४, बिलोली ४२.३१, देगलूर ६०, धर्माबाद १३.२७, हदगाव २१.६०, हिमायतनगर १९.७२, कंधार ७३.०९, किनवट २९.९२, लोहा ४४.६०, माहूर ३९.७४, मुखेड ६३.८६, मुदखेड २४.४३, नायगाव ६७.६९ तर उमरी तालुक्यातील पुनर्परीक्षेचा निकाल ११.८६ टक्के इतका लागला आहे. पुनर्परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ९६२ मुले तर ३९६ मुलींचा समावेश आहे.
---
लातूर विभागात नांदेड तिसºया स्थानावर
इयत्ता दहावीचा लातूर विभागाचा निकाल ८६.३० टक्के इतका लागला असून यावेळी नांदेड जिल्हा निकालात तिसºया स्थानावर गेला आहे. विभागात लातूर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक चांगला म्हणजेच ९०.२० टक्के एवढा लागला आहे. त्यापाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्याचा निकाल ८५.६६ टक्के इतका लागला असून नांदेड जिल्ह्याचा निकाल ८३.०३ टक्के तर मागील वर्षी निकाल ८३.०६ टक्के इतका होता.
---
८६.४२ टक्के मुली, ८०.०७ टक्के मुले उत्तीर्ण
दहावी परीक्षेच्या निकालाची आकडेवारी पाहता मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८६.४२ टक्के तर मुलांचे प्रमाण ८०.०७ टक्के आहे. मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ६.३५ टक्के एवढे अधिक आहे. तालुकानिहाय मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी पाहता नांदेड ८५.२५, अर्धापूर ८५.२२, भोकर ७९.१७, बिलोली ९१.५०, देगलूर ८८.६७, धर्माबाद ८१.४३, हदगाव ७७.४५, हिमायतनगर ८१.१२, कंधार ९५ टक्के, किनवट ८५.२६ टक्के, लोहा ८७.६२, माहूर ८७.१६, मुखेड ९६.०५, मुदखेड ७६.७२, नायगाव ९१.५२ तर उमरीतील मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८४.०१ टक्के इतके आहे.