नांदेड जिल्ह्यात अवकाळीने पळविला तोंडचा घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:28 AM2018-04-17T00:28:09+5:302018-04-17T00:28:09+5:30

फेब्रुवारीमधील गारपिटीच्या नुकसानीने बळीराजा सावरतो न सावरतो तोच रविवारी झालेल्या अवकाळीसह गारपिटीने शेकडो हेक्टरवरील फळबागांसह हळद, ऊस पिकांना फटका बसला आहे़ यामध्ये नांदेड, अर्धापूर, हदगाव, मुदखेड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे़

Nanded district faces dreary; | नांदेड जिल्ह्यात अवकाळीने पळविला तोंडचा घास

नांदेड जिल्ह्यात अवकाळीने पळविला तोंडचा घास

googlenewsNext
ठळक मुद्देशेकडो हेक्टरला फटका : केळीच्या बागा झाल्या आडव्या, हळदीचा रंगही पडला फिका

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : फेब्रुवारीमधील गारपिटीच्या नुकसानीने बळीराजा सावरतो न सावरतो तोच रविवारी झालेल्या अवकाळीसह गारपिटीने शेकडो हेक्टरवरील फळबागांसह हळद, ऊस पिकांना फटका बसला आहे़ यामध्ये नांदेड, अर्धापूर, हदगाव, मुदखेड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे़
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार,रविवारी नांदेड जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने झोडपले़ वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटांत पाऊस झाला़ नांदेड शहर व परिसरात तासभर झालेल्या पावसाने शहरातील नाल्या ओहरफ्लो होवून सर्वत्र रस्त्यांनी पाणीच पाणी झाले होते़ तर होर्डिंग्ज आणि दुकानांसमोरील बॅनर वा-याने रस्त्यावर येवून पडले होते़ तर ग्रामीण भागात आंबा, केळी, चिकू, ऊस आदी पिकांसह अनेक ठिकाणच्या शेतातील झोपड्या वादळी वाºयाने जमीनदोस्त केल्या़ घरावरील पत्रे उडूनही नुकसान झाल्याच्या घटना नांदेड तालुक्यातील तळणी, धानोरा परिसरात घडल्या़ वाºयाचा जोर प्रचंड असल्याने झाडांच्या फांद्या पडून महावितरणचे मोठे नुकसान झाले़
इसापूर धरणाचे पाणी न मिळाल्याने अर्धापूर तालुक्यातील बहुतांश शेतकºयांनी आपल्या केळीच्या बागा तोडून काढल्या होत्या़ त्यातच काही शेतकºयांनी उपलब्ध पाण्यामध्ये ठिबक तसेच जिवाचे रान करून आपल्या केळी बागा जगविल्या आहेत़ केळीचे घड नुकतेच भरत असताना वादळी वाºयाने कहर केला़ यात बहुतांश ठिकाणच्या बागांना फटका बसला असून उभ्या केळी आडव्या झाल्या आहेत़ तसेच हळद वाळून ती ढोल करायला (पॉलिश) आली असता अवकाळीने गाठले़ हळद भिजल्याने कोट्यवधी रूपयांचा तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे़ साडेआठ हजार रूपये प्रतिक्विंटल मिळणारा भाव हळद भिजल्याने निम्मादेखील मिळणार नाही़
नांदेड तालुक्यातील राहाटी, तळणी, धानोरा आदी परिसरातील आंब्यासह संत्रा, मोसंबी, केळीच्या बागांचे नुकसान झाले आहे़ वाºयाच्या जोराने उभा ऊसदेखील आडवा झाला आहे़ तालुक्यात अंदाजे २०० हेक्टर बागायती आणि ५० हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार किरण अंबेकर यांनी दिली़ मंगळवारपासून प्रत्यक्षात पंचनाम्यांना सुरूवात होईल़ यानंतर नुकसानीचा खरा आकडा समोर येईल, असेही अंबेकर यांनी सांगितले़ पाऊस अन् गारांमुळे पार्डी परिसरातील निमगाव देळूब, कारवाडी, चोरंबा, शेणी भागातील केळी, ज्वारी, टरबूज, हळद, आंब्यासह भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले़ सोसाट्याच्या वाºयामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेली़ झाडे उन्मळून पडली़ निमगाव येथे केळीचे नुकसान झाले असून हातात आलेले केळीची बाग गेल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत़

कर्नाटकला जाणारी डाळही भिजली
माहूर तालुक्यातील वाई बाजारसह परिसरात वादळी वाºयासह गारांचा पाऊस झाला़ यामध्ये वाई परिसरातील वादळी वाºयासह पावसाने परिसरातील बागायतीचे पिकांचे नुकसान झाले़ तसेच जय योगेश्वर अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज (दालमिल)मधील हजारो क्विंटल तूरडाळ भिजली़
दालमिलचे टिनशेड जमिनीच्या दिशेने झुकल्याने शेडमध्ये असलेली १२६०० पोती तूरडाळ पावसाने भिजून खराब झाली़ ही डाळ कर्नाटक सरकारला पुरवठा करायची होती. सदर पोत्यामध्ये १ किलो वजनी असलेले २५ पॉकीट होते़ तसेच या शेडच्या परिसरात ३९० किलो मोकळी तूरडाळ व ३० क्विंटल हरभºयाचेही नुकसान झाले़ यात मोठे नुकसान झाल्याचे इंडस्ट्रीजचे मालक अतीश गेंटलवार यांनी सांगितले़
महसूल विभागाचे मंडळ निरीक्षक व्ही़एमग़ड्डमवार, अव्वल कारकून एस़पी़जुकंटवार, संतोष पवार, तलाठी काळे यांनी पंचनामा केला़


फेब्रुवारीत झालेल्या गारपिटीत २०० कोटींचे अनुदान वाटप
फेब्रुवारीमध्ये झालेल्या गारपिटीने लिंबगाव परिसरातील फळबागांसह उन्हाळी ज्वारीचे मोठे नुकसान झाले होते़ दरम्यान, शासनाच्या वतीने दीड ते दोन महिन्यांतच नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत दिली़ पिकानुसार शेतकºयांना अनुदान देण्यात आले़ नांदेड तालुक्यात जवळपास २०० कोटी रूपयांचे अनुदान शेतकºयांना वाटप करण्यात आले़ अवकाळीने वाई बाजार येथील अ‍ॅग्रो इंडस्ट्रीचे नुकसान झाले आहे़
नांदेड उत्तरमध्ये नुकसानीची आ. डी. पी. सावंत यांनी पाहणी करून शेतकºयांना तात्काळ मदत करण्याची मागणी केली़ नाळेश्वर, राहाटी व ढोकी गावांतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ आ़सावंत यांनी भेट देवून शेतकºयांशी संवाद साधला़ यावेळी सभापती सुखदेव जाधव, साहेबराव धनगे, दीपक पाटील, नरहरी वाघ, माधवराव वाघ, रंगनाथ वाघ, बबन वाघमारे, अतुल वाघ आदी उपस्थित होते़

Web Title: Nanded district faces dreary;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.