नांदेडातील जिल्हा रुग्णालय डीपीडीसीच्या सलाईनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 01:03 AM2017-11-25T01:03:33+5:302017-11-25T01:03:43+5:30
औरंगाबादनंतर चांगल्या आरोग्य सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या नांदेडातील श्री गुुरुगोविंदसिंघजी शासकीय रुग्णालय तब्बल दीड वर्षे बंद राहिल्यानंतर आता नूतनीकरण की नवनिर्माण? याचाच घोळ सुरु आहे़ त्यात कसाबसा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग कार्यान्वित करण्यात आला़, परंतु या विभागाला औषधी खरेदी आणि साहित्यासाठी आरोग्य विभागाकडून निधीच मिळाला नाही़ आजघडीला डीपीडीसीच्या निधीद्वारे मिळणाºया सलाईनवरच रुग्णालयाचा कारभार सुरु आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: औरंगाबादनंतर चांगल्या आरोग्य सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या नांदेडातील श्री गुुरुगोविंदसिंघजी शासकीय रुग्णालय तब्बल दीड वर्षे बंद राहिल्यानंतर आता नूतनीकरण की नवनिर्माण? याचाच घोळ सुरु आहे़ त्यात कसाबसा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग कार्यान्वित करण्यात आला़, परंतु या विभागाला औषधी खरेदी आणि साहित्यासाठी आरोग्य विभागाकडून निधीच मिळाला नाही़ आजघडीला डीपीडीसीच्या निधीद्वारे मिळणाºया सलाईनवरच रुग्णालयाचा कारभार सुरु आहे़
डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे २० आॅक्टोबर २०१५ रोजी विष्णूपुरी येथे स्थलांतर झाले़ त्यानंतर या ठिकाणच्या सर्व इमारती आरोग्य विभागाच्या ताब्यात देण्यात आल्या़ त्यावेळी ३२ कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला होता़ त्यातून बाह्यरुग्ण, आंतररुग्ण, इतर विभागासह अंतर्गत रस्त्यांचा समावेश होता, परंतु अनेक दिवस नूतनीकरण की नवनिर्माण? या घोळातच हे काम अडकले़ राजकीय हस्तक्षेपामुळे महाविद्यालयाचे स्थलांतरण झाल्यानंतरही तब्बल दीड वर्षे हे रुग्णालय बंदच होते़ २०० खाटांची मान्यता असलेल्या श्री गुरु गोविंदसिंघजी शासकीय रुग्णालयात पहिल्या टप्प्यात शंभर खाटांचे रुग्णालय सुरु करण्यात येणार होते़ वाढत्या दबावानंतर १२ मार्च २०१७ रोजी घाईघाईत बाह्य रुग्ण विभाग सुरु करण्यात आला़ परंतु या विभागाच्या नूतनीकरणावर केलेला खर्च हाही चर्चेचा विषय बनला़ नवीनच असलेल्या या इमारतीच्या नूतनीकरणावर कुठलाही मोठा फेरबदल न करता तब्बल सात कोटींचा चुराडा करण्यात आला़, परंतु बाह्यरुग्ण विभाग सक्षमपणे सुरु ठेवण्यासाठी प्रशासनाने केलेल्या पाच कोटींच्या मागणीकडे मात्र दुर्लक्षच करण्यात आले़
या पाच कोटींतून १ कोटी ८१ लाखांची औषधी खरेदी, १४ लाखांचे फर्निचर, ४ लाखांची प्रयोगशाळा व इतर बाबींचा समावेश होता़ त्यामुळे रुग्णालयातील इतर विभाग सुरुच झाले नाही़ तर बाह्यरुग्ण विभागही डीपीडीसीतून मिळणाºया निधीवरच सुरु आहे़ गेल्या नऊ महिन्यांत बाह्य रुग्ण विभागात ८० हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे़ १५० नेत्र तर ३०० हार्नियाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत़ नांदेड शहरातील जनतेच्या दृष्टीने हे रुग्णालय अतिशय महत्त्वाचे आहे़