नांदेड जिल्ह्यातील शिक्षक, मुख्याध्यापकांनाही ‘ड्रेसकोड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 01:06 AM2018-07-04T01:06:15+5:302018-07-04T01:07:10+5:30

जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांप्रमाणेच आता शिक्षक, मुख्याध्यापकांसह विस्तार अधिकारीही गणवेशामध्ये दिसणार आहेत़ मंगळवारी जिल्हा परिषदेत शिक्षण समितीची बैठक पार पडली़ या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला़ शिक्षकांनी या निर्णयाचे स्वागत करीत अंमलबजावणीसाठी सहकार्य करण्याची अपेक्षाही या बैठकीत व्यक्त करण्यात आली़

Nanded district teachers and headmasters also get 'dress code' | नांदेड जिल्ह्यातील शिक्षक, मुख्याध्यापकांनाही ‘ड्रेसकोड’

नांदेड जिल्ह्यातील शिक्षक, मुख्याध्यापकांनाही ‘ड्रेसकोड’

googlenewsNext
ठळक मुद्देशिक्षण समितीच्या बैठकीत निर्णय : १५ आॅगस्टपूर्वी अंमलबजावणी करण्याचा जि़प़चा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांप्रमाणेच आता शिक्षक, मुख्याध्यापकांसह विस्तार अधिकारीही गणवेशामध्ये दिसणार आहेत़ मंगळवारी जिल्हा परिषदेत शिक्षण समितीची बैठक पार पडली़ या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला़ शिक्षकांनी या निर्णयाचे स्वागत करीत अंमलबजावणीसाठी सहकार्य करण्याची अपेक्षाही या बैठकीत व्यक्त करण्यात आली़
शिक्षण व आरोग्य सभापती माधवराव मिसाळे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची बैठक सोमवारी दुपारी पार पडली़ या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे यांनी शिक्षकांसह विस्तार अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी यांनाही ड्रेसकोड लागू करण्याची मागणी करीत या विषयावर चर्चा करण्याची विनंती केली़ खाजगी शाळांमध्ये अत्यल्प वेतन असणारे शिक्षक, कर्मचारी ड्रेस कोडमध्ये असतात़ जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना सर्व सेवा सुविधा मिळतात़ त्यामुळे या शिक्षकांनाही ड्रेसकोड लागू केल्यास जिल्हा परिषदेची प्रतिमा वाढेल़ याबरोबरच ड्रेसकोडमुळे शिक्षकाची स्वतंत्र ओळख निर्माण होईल़ सदर शिक्षक कोठेही दिसल्यास तो जिल्हा परिषदेचा शिक्षक असल्याचे ओळखू येईल़ त्यामुळे विद्यार्थ्यांवरसुद्धा या निर्णयाचे चांगले परिणाम होतील असे सांगत शिक्षकांना ड्रेसकोड लागू करण्याची मागणी धनगे यांनी केली़ यावर बैठकीला उपस्थित असलेले व्यंकटराव गोजेगावकर, लक्ष्मणराव ठक्करवाड, बबन बारसे, ज्योत्स्ना नरवाडे, संध्याताई धोंडगे, अनुराधा पाटील आदींनी चर्चा करुन ड्रेसकोडच्या या निर्णयाला मान्यता दिली़ त्यामुळे येत्या १५ आॅगस्टपूर्वी नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षक तसेच विस्तार अधिकारीही जिल्हा परिषदेने ठरवून दिलेल्या ड्रेसमध्येच दिसणार आहेत़ या ड्रेसचा रंग काय असावा या बाबतही बैठकीत चर्चा झाली़ मात्र यावर ठोस निर्णय न झाल्याने पुढील बैठकीत शिक्षकांसह मुख्याध्यापक आणि विस्तार अधिकाऱ्यांना कोणत्या रंगाचा ड्रेस मिळणार, हे निश्चित होणार आहे़
दरम्यान, या बैठकीत इतर विषयांवरही चर्चा झाली़ शिक्षणसेविका ज्योती सुकणीकर यांना बनावट कागदपत्राआधारे प्रवर्ग बदलून नियमित शिक्षक व नियमित वेतनश्रेणी देण्यात आली़ या प्रकरणाच्या संचिकेवर अधिकारी, कर्मचाºयावर निलंबनाची कारवाई करावी असे तत्कालिन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांनी स्पष्टपणे लिहिले असताना शिक्षण विभागातील काही लिपीक, कक्ष अधिकारी, अधीक्षक यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या टिप्पणी विरोधात निलंबन करण्यापेक्षा नोटीस देणे योग्य असा शेरा लिहून वरिष्ठ अधिकाºयांच्या आदेशाची अवहेलना केली़ त्यामुळे याप्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाºयाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी जि.प. सदस्य धनगे यांनी केली़ यावर अशा पद्धतीच्या टिप्पण्या लिहिणाºया अधिकारी, कर्मचाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला़ दरम्यान, सुकणीकर प्रकरणी शिक्षणाधिकारी दिग्रसकर हे राजकीय दबाव असल्याचे सांगत आहेत़ शिक्षणाधिकारीच असे दबावाखाली येणार असतील तर या विभागाचा कारभार चालणार कसा ? असा प्रश्न करीत शिक्षणाधिकाºयांनी त्यांच्यावर कोण दबाव टाकत आहे़ त्यांची नावे जाहीर करण्याची मागणी धनगे यांच्यासह इतर सदस्यांनी बैठकीत केली़ सुकणीकर प्रकरणाशी संबंधित असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणीही सदस्यांनी लावून धरली़
---
ड्रेसकोडसाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित
२०१२ मध्येही जिल्हा परिषदेने शिक्षकांना ड्रेसकोड लागू केला होता़ मात्र वर्षभरच त्याची अंमलबजावणी झाली़ आत पुन्हा शिक्षकांसह विस्तार अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी यांना ‘ड्रेसकोड’ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ १५ आॅगस्टपूर्वी निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल़ ड्रेसकोडमुळे शिक्षकांबरोबरच जिल्हा परिषदेचीही प्रतिमा उंचावण्यास मदत होईल़ त्यामुळे शिक्षकांचे सहकार्य मिळेल असा विश्वास जि़प़चे शिक्षण सभापती माधवराव मिसाळे यांनी व्यक्त केला.
---
वेतन पथकातील दोघांवर होणार कारवाई
बिलोली तालुक्यातील बिजूर प्राथमिक शाळेची मान्यता ८० टक्के असताना तेथे १०० टक्के पगार काढण्यात आला आहे़ यासंबंधी यापूर्वी झालेल्या अनेक बैठकांतही हा विषय उपस्थित झाला होता़ संयुक्त खाते मुख्याध्यापक व शिक्षणाधिकारी असे असताना संस्थाचालक व मुख्याध्यापक असे संयुक्त खाते कोणत्या नियमाने काढण्यात आले़ यावर शिक्षणाधिकाºयांकडून खुलासा होवू शकला नव्हता़ बिजूर प्राथमिक शाळेचा हा मुद्दा मंगळवारी झालेल्या बैठकीतही पुन्हा उपस्थित झाला़ यावर वेतन भनिनि पथक (प्राथमिक) या कार्यालयातील एऩएस़राठोड व कनिष्ठ लिपीक एस़एऩ देशटवार यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला़

 

Web Title: Nanded district teachers and headmasters also get 'dress code'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.